Vinod Tawde Vs Hitendra Thakur : "तावडेंनी 25 फोन केले, माफी मागितली, सोडा म्हणाले...", ठाकूर यांनी खळबळ उडवली

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 02:53 PM)

विरार पूर्व परिसरात असलेल्या विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा झाला असून, सध्या वातावरण तापलेलं आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकुरांचे गंभीर आरोप

point

ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तापडेंना घेरलं

point

विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा

Hitendra Thakur Vs Vinod Tawde : राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या निवडणुकासाठी वेगवेगळ्या पक्षांचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्रात आहे. त्यातच आज विनोद तावडे हे विरारमध्ये असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करत हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेतलं असून, बरीच मोठी बाचाबाची झाली. विनोद तावडे यांना पैसे वाटताना पडकलं असून, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांना उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत इथेच डांबून ठेवू असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. विरार पूर्व परिसरात असलेल्या विवांत हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला असून, सध्या इथे वातावरण तापलेलं आहे.

हे वाचलं का?

 

"तावडेंनी 25 फोन केले, माफी मागितली"

 

विनोद तावडे या एका हॉटेलमध्ये बसलेले असताना तिथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. या कार्यकर्त्यांनी तिथे पोहोचताच विनोद तावडे यांना सवाल करत गोंधळ करायला सुरूवात केली. यावेळी त्यांच्याकडे काही पैसे आणि डायरी सापडल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर विनोद तावडे यांनी आम्हाला 25 फोन केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला असून, ते आपली माफी मागत होते आणि सोडून देण्याची विनंती करत होते असंही त्यांनी सांगितलं. 

 

"मला भाजपनेच सांगितलं तावडे 5 कोटी घेऊन येतायत"

हितेंद्र ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकणाबद्दल बोलताना सांगितलं की, मला भाजपच्याच लोकांनी विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार असं सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं त्यामुळे आता त्यांचा इशारा नेमका कुणाकडे होता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाही, पण ते आले तर इथे पैसे होते, वाटपही चालू होतं, कार्यकर्तेही होते. विनोद तावडे आता बायकांच्या गराड्यात लपून बसलेत असा आरोप त्यांनी केला.



    follow whatsapp