Eknath Shinde Shiv Sena : मतदानाच्या एक दिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा दणका

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 01:01 PM)

शिंदेंच्या शिवसेनेसाठी ऐन मतदानाच्या एक दिवस आधी ही नोटीस आल्यानं हा मोठा धक्का मानला जातोय. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

टीव्ही मालिकांमधील जाहिरातींप्रकरणी नोटीस

point

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले होते आरोप

point

सावंत यांच्या तक्रारीनंतर आयोगाची नोटीस

मराठी टीव्ही मालिकांमध्ये पक्षाची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी याप्रकरणी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. काही टीव्ही मालिकांमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पोस्टर दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यात काल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर आता उद्या राज्यभर मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसाठी ऐन मतदानाच्या एक दिवस आधी ही नोटीस आल्यानं हा मोठा धक्का मानला जातोय. 

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Sanjay Raut : "भाजपला राज्यात संध्याकाळपर्यंत...", देशमुखांवरील हल्ल्यानंतर राऊतांचा गंभीर आरोप

 

निवडणुकीदरम्यान रॅली, सभा, चिन्ह, फलक, जाहिराती, पेपरवरील जाहिराती असे वेगवेगळे प्रकार आपण प्रचारादरम्यान पाहत असतो. निवडणूक काळात प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात असताना आपण पाहत असतो. पण शिंदेंच्या शिवसेने थेट टीव्ही मालिकेतून प्रचार केल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला होता. 'स्टार प्रवाह' या चॅनलवरही कारवाई केली पाहिजे अशीही मागणी केली होती.पेनड्राईव्हसहित पुरावा घेऊन त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला नोटीस पाठवली असून, अशा जाहिरातीवरील खर्च 24 तासात जाहीर करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना याबद्दल काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

 

सचिन सावंत यांनी काय तक्रार केली होती? 

 

सचिन सावंत यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले होते. मालिकेच्या काही भागांचे व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं होतं की, "महायुतीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता व ४ वाजता पुन: प्रक्षेपित भागात खुलेआम महायुतीच्या (शिंदे सेनेच्या)जाहिरातीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. त्याच पध्दतीने "प्रेमाची गोष्ट" व इतरही मालिकांमध्ये ही जाहिरात चित्रांकीत करण्यात आली आहे.  एका सिनवरून दुसऱ्या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे. निवडणूक आयोगापासून हे लपवून केले जात आहे.  विशेष म्हणजे डिस्ने हॉट स्टार वर या चॅनल मधील या मालिकेचे भाग दिसतात पण कुठही रेकॉर्ड राहू नये म्हणून तीथे जाहिरातींचा भाग दडवण्यात आला आहे.संविधान, लोकशाही, निवडणूक आयोग यांची तमा तर यांना नाहीच पण नैतिक पातळीवर ही यांचे अध:पतन झाले आहे. अशा किती कुटील क्लुप्त्या यांनी वापरल्या आहेत हे निवडणूक आयोगाने शोधून काढले पाहिजे." असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. 

    follow whatsapp