Gadchiroli-Chimur Lok sabha 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 03 Jun 2024, 08:19 PM)

Gadchiroli-Chimur Lok sabha 2024: गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक निकाल

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक निकाल

follow google news

Lok sabha Election 2024 Gadchiroli-Chimur: गडचिरोली-चिमूर: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या (Gadchiroli-Chimur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (gadchiroli chimur lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

 

LIVE UPDATE: 

  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 64.95 टक्के मतदान
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 55.79 टक्के मतदान
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 41.01 टक्के मतदान पार पडलं
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजेपर्यंत 8.99 टक्के मतदान 
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.43 टक्के मतदान
  • तर वंचित बहुजन आघाडीने इथे हितेश पांडुरंग मडावी यांना उमेदवारी दिली आहे. 
  • गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रसेचे नामदेव किरसान अशी लढाई आहे.
  • पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूरमध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - अशोक नेते

  2. काँग्रेस - नामदेव किरसान

  3. वंचित बहुजन आघाडी - हितेश पांडुरंग मडावी

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: अशोक नेते (विजयी उमेदवार- भाजप) 45.05% मतं

  2. वर्ष- 2014: अशोक नेते (विजयी उमेदवार- भाजप) 52.18% मतं

  3. वर्ष- 2009: मारोतराव कोवासे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 38.43% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    follow whatsapp