Lok Sabha Election 2024 Maharashtra Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे. कारण आजवर कधीही न झालेल्या युती-आघाडी आणि त्यासोबतच लढती या निवडणुकीत होणार आहे. कधीकाळी एकमेकांचे विरोधक असलेले हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने एकत्र आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागलं आहे. त्यातच वेगवेगळे ओपिनियन पोलही आता समोर येत आहे. त्यापैकी इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (india tv cnx maharashtra opinion poll maha vikas aghadi will win in 6 seats of bjp mahayuti see the full list lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी 13 जागा मिळतील. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा आणि काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळेल.
मात्र, महाविकास आघाडी भाजप आणि महायुतीच्या जागा असलेल्या मतदारसंघावर आपला झेंडा फडकवून मोठा झटका देऊ शकतं. ओपिनियन पोलनुसार, असे नेमके कोणते मतदारसंघ असणार हेच आपण आता पाहूयात.
मविआ इथे देणार महायुतीला धक्का?
1. नाशिक - सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे हे खासदार आहेत आणि त्यांनाच या मतदारसंघातून पुन्हा तिकीट मिळण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र, India TV-CNX च्या सर्व्हेनुसार, नाशिकमध्ये यंदा शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळू शकतो.
2. माढा - माढा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी त्यांनाच भाजपने उमेदवारी देखील जाहीर केली आहे. मात्र, यामुळे माढामध्ये बरीच धुसफूस सुरू झाली आहे. ज्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला होऊन त्यांचा खासदार तिथून निवडून येऊ शकतो असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : काँग्रेसचे उमेदवार ठरले! ठाकरेंकडून 'या' जागा गेल्या?
3. शिर्डी - शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. दोन्ही वेळेस त्यांनी शिवसेनेचे तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, आता ते शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ही जागा शिवसेना (ठाकरे गट) जिंकण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या जागी नेमका कोणता उमेदवार असणार हे युती किंवा आघाडीकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यावर देखील बरंच गणित हे अवलंबून असणार आहे.
4. हिंगोली - हिंगोली मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांना मोठा झटका बसू शकतो. कारण या मतदारसंघातून यंदा काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो असं अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.
5. रामटेक - मागील दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आता ते शिवसेना शिंदे गटात गेल्याने त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकण्याची शक्यता असल्याचं सर्व्हेत म्हटलंय.
6. हातकणंगले - शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला आस्मान दाखवत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. मात्र, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या जागेवर शिवसेना (ठाकरे गट) विजयी होण्याची शक्यता सर्व्हेत वर्तविण्यात आली आहे. धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहे.
हे ही वाचा>> Yugendra Pawar : अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेरलं
इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सुरुवातीला शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवणार आहेत. अशावेळी 48 जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबाबत ओपिनियन पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT