Central Election Commission of India, Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जूनला जाहीर होणार आहे. तत्पुर्वी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची दखल आता निवडणूक आयोगाने (Election Commission of India) घेतली आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचा अहवाल मागितला आहे. या अहवालात काही तथ्य आढळल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाईची शक्यता आहे. (lok sabha elction uddhav thackeray press conference ashish shelar complaint state election commision of india and central election commision maharashtra lok sabha)
ADVERTISEMENT
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात 20 मे रोजी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या संबंधित तक्रार देखील शेलारांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : अजित पवारांच्या उमेदवाराविरोधातच भाजपने दिला उमेदवार!
त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमंक त्या दिवशी पत्रकार परिषदेत काय झालं होतं, याची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसूदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आता काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT