Yogendra Yadav on Lok Sabha Election: नवी दिल्ली: योगेंद्र यादव हे एक प्राध्यापक, राजकीय विश्लेषक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत जे वृत्तवाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीवरील त्यांचे विश्लेषण चर्चेचा विषय राहिले आहे. त्यांचे व्हिडीओ आणि निवडणूक विश्लेषणातील आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जूनला निकाल जाहीर होणार असला तरी त्याआधी सर्वांच्या नजरा या प्रश्नाकडे लागल्या आहेत की, यावेळी देशात कोणाचे सरकार स्थापन होणार, NDA की INDIA? हे जाणून घेण्यासाठी 'News Tak'ने योगेंद्र यादव यांच्याशी खास बातचीत केली. (lok sabha election 2024 bjp nda will win only 22 seats and india alliance in maharashtra yogendra yadav Says exact number)
ADVERTISEMENT
यावेळी देशातील आकडेवारीसोबत योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या आकडेवारीचा देखील अंदाज व्यक्त केला. त्यांनी जो अंदाज वर्तवला आहे त्याने भाजप आणि एनडीएची चिंता मात्र नक्कीच वाढली आहे.
हे ही वाचा>> महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?
यावेळी भाजप-काँग्रेस, एनडीए-इंडिया सोबतच कोणत्या राज्यांमध्ये कोणता पक्ष आघाडीवर आहे? या सर्व बाबींवर त्यांच्या आकडेवारीसह तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया योगेंद्र यादव यांचे अंदाज काय आहेत?
महाराष्ट्रात NDA चा पराभव करून INDA मारणार बाजी
News Tak शी खास बातचीत करताना योगेंद्र यादव म्हणाले की, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-एनडीएचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत, त्यापैकी 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 42 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी एनडीएला तब्बल 20 जागांवर नुकसान होऊ शकतं. म्हणजेच 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि एनडीएचे जे काही नुकसान होईल, त्याचा थेट फायदा हा India आघाडीला होईल. गेल्या वेळी 6 जागांवर मर्यादित असलेल्या विरोधी आघाडीला यावेळी 26 जागा मिळू शकतात.' असे त्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?
'भाजपला मिळू शकतात केवळ 230 जागा'
दरम्यान, देशभरात भाजपला किती जागा मिळतील यावर उत्तर देताना योगेंद्र यादव म्हणाले की, 'मला वाटते की, या निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत 272 जागांचा बहुमताचा आकडा मिळेल असे वाटत नाही. भाजपला जवळपास 250 जागा मिळू शकतात. पण त्यांच्या जागा 230 पर्यंत खाली आल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजपचा मित्रपक्ष एनडीएला मिळणाऱ्या जागांवर ते म्हणाले की, एनडीए मिळून बहुमताचा आकडा म्हणजेच 272 जागांपर्यंत पोहोचू शकेल, परंतु मला याबद्दल खात्री नाही.'
तर काँग्रेसच्या जागांबाबत योगेंद्र यादव म्हणाले की, 'या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा दुप्पट होऊ शकतात. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळताना दिसत आहेत. तर विरोधी म्हणजेच INDIA आघाडीच्या इतर पक्षांना 120 ते 125 जागा मिळू शकतात. म्हणजे एकूणच INDIA आघाडीला 220 ते 230 जागा मिळू शकतात. याचाच अर्थ महायुतीला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळेल असे वाटत नाही.
ADVERTISEMENT