Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस देणार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा?

मुंबई तक

• 04:04 PM • 05 Jun 2024

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन थेट असं जाहीर केलं की, 'पक्षाने मला सरकारमधून मोकळं करावं.' त्यामुळे ते आता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ेवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?

ेवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?

follow google news

Devendra Fadnavis: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) भाजपच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी झालेला पराभव हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन थेट असं जाहीर केलं की, 'पक्षाने मला सरकारमधून मोकळं करावं.' (lok sabha election 2024 maharashtra politics will devendra fadnavis resign from the post of deputy chief minister)

हे वाचलं का?

आता देवेंद्र फडणवीस यांच्या याच विधानानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले.. 

'शेवटी मी कितीही गणितं मांडली तरी हे खरं आहे की, जागा कमी आलेल्या आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एकप्रकारे भाजपमध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो... मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वत: यामध्ये कमी पडलेलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.' 

'त्यामुळे हा जो काही भाजपला सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस.. मी.. या ठिकाणी स्वीकारतो.' 

'मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भाजपमध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल.' 

'अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं ते आमची टीम करेल. त्यांच्यासोबत आमची टीम करणारच आहे. त्यांच्यासोबत मी असणार आहेच. या संदर्भात मी लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा डाव टाकला आहे.

    follow whatsapp