Lok Sabha Election 2024: प्रकाश आंबेडकरांची प्रचंड मोठी घोषणा; 'मविआ'च्या 'या' उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा

रोहित गोळे

• 05:08 PM • 23 Mar 2024

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पाहा त्यांनी नेमकी काय घोषणा केली.

प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

follow google news

Prakash Ambedkar support to Shahu Maharaj Chhatrapati: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 मार्च) मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत मविआ आणि वंचितमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अद्यापही मविआ वंचितला किती आणि कोणत्या जागा देणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, असं असतानाही प्रकाश आंबेडकरांनी मविआच्या एका दिग्गज उमेदवाराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. (lok sabha election 2024 prakash ambedkar big announcement vba give unconditional support for mva and congress candidate shahu maharaj chhatrapati announced)

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं की, 'कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचा आगामी निवडणुकीत पूर्ण पाठिंबा राहील. तसंच मागे जे घडलं होतं.. ते यावेळेस न घडू देणं याची दक्षताही घेण्यात येईल.'  

पाहा प्रकाश आंबेडकर शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा देण्यातबाबत नेमकं काय म्हणाले... 

'कोल्हापूरमधील आमचं जे युनिट आहे.. याचा निर्णय झाला आहे की, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने दिली आहे. आम्ही पक्ष आणि विचारसरणी म्हणून.. फुले-शाहू-आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. यामुळे शाहू महाराजांचं कुटुंब हे जवळचं असलेलं कुटुंब आम्ही मानतो. त्यामुळे निर्णय घेण्यात आला आहे की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.' 

 

'त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे-जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं होतं.. ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांचं काँग्रेसने नाव जाहीर केलं आहे. त्याला वंचित बहुजन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.' अशी घोषणा करत या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. 

'आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय...'

दरम्यान, यावेळी प्रकाश शेंडगेंच्या पक्षाबाबत जेव्हा पत्रकारांनी आंबेडकरांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, 'ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडेही सादर केली आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही...' असं आंबेडकर म्हणाले. 

हे ही वाचा>> 'मी ठरवलं BJPसोबत जायचंय, तर..', आंबेडकरांचं मोठं विधान

'मविआमध्ये जागा वाटप ठरलेलं नाही, पण वंचित टार्गेटवर..'

'तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असतं तर कदाचित जे घोंगड भिजतयं ते भिजलं नसतं. तुम्ही सर्वांनी आम्हाला टारगेट केलं. म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता बाग द्यायला लागलं आहे. 10 जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांचा दावा आहे. 5 जागांवर राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस असा वाद आहे. या बातमीला प्राधान्य मिळालं असतं तर प्रश्न सुटला असता. पण सगळं टार्गेट वंचितवर होतं. आजही त्यांचा तिढा संपलाय असं काही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही.;

'त्यांचाच तिढा मिटणार नाही तर आमच्या एंट्रीचा काय फायदा.. 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. त्यात एक भूमिका आम्ही मांडलेली आहे. आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी आम्हाला कळवाव्या. त्यामुळे आम्ही कुठेही थांबलेलो नाही.' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मविआमध्येच जागा वाटपाचा तिढा आहे आणि तो मिटल्याशिवाय वंचितच्या जागांचा निर्णय होऊ शकत नाही. असं विधान केलं आहे.

हे ही वाचा>> Sanjay Raut : ''तुमच्यात हिम्मत असेल तर...'', राऊतांचे थेट अजित पवारांना आव्हान

आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये जाहीर केलेल्या पाठिंब्याचा आणि मविआमध्ये तिढा असलेल्या आरोपावर तीनही पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp