Ajit Pawar on Nilesh Lanke: पारनेर: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचाराला आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांचा मात्र खरपूस समाचार घेतला. सभेत अनेक गंभीर आरोप करत अजित पवारांचा पारा अचानक चढला. (lok sabha election 2024 serious allegations against nilesh lanke ajit pawar got angry in parner meeting ahmednagar lok sabha election)
ADVERTISEMENT
भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्याविरोधात तगडं निलेश लंके यांनी आव्हान उभं केलं आहे. लोकसभा निवडणुआधी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. ज्यानंतर त्यांना दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पण हीच गोष्ट अजित पवार यांच्या बरीच जिव्हारी लागली.
हे ही वाचा>> Live : "पवार-ठाकरेंना ऑफर", मोदींच्या विधानाचा फडणवीसांनी सांगितला नेमका अर्थ
अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर जे आमदार अजित पवारांसोबत गेले होते त्यामध्ये निलेश लंकेंचाही समावेश होता. पण वर्षभराच्या आतच निलेश लंके हे शरद पवारांकडे परतले. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही त्यांनी लंकेंविरोधात स्वत: प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, पारनेरच्या जाहीर सभेत अजित पवार हे MIDC च्या मुद्द्यावर बोलताना अचानक संतापले. एवढंच नव्हे तर त्यांनी 'वाट्टोळं होईल वज वाट्टोळं होईल..' असे उद्गारही काढले. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.
'अरे हरा#$%* नो कुठे फेडाल ही पापं..', अजित पवार कुणावर संताप
'आज पारनेरच्या MIDC मध्ये काय चाललंय.. मला सांगण्यात आलं की, MIDC मध्ये बाहेरची लोकं आणली, परराज्यातील.. काय माझ्या पारनेरची लोकं नव्हती? त्यांना काम नको होतं? तुम्ही बाहेरची लोकं आणता 800 रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडून सह्या घेता आणि त्यांच्या हातावर 400 रुपये टेकवता.'
हे ही वाचा>> "...त्यामुळे ते अस्वस्थ आहेत", मोदींच्या 'ऑफर'वर पवारांचं विधान
'अरे हरा#$%* नो कुठे फेडाल ही पापं.. त्या गरीबाच्या कष्टाचा पैसा तुम्हाला अशा पद्धतीने पचनी पडणार नाही. त्यामध्ये यांचं वाट्टोळं होईल वज वाट्टोळं होईल..'
'यामध्ये तुम्ही काळजी करू नका.. अनेक उद्योगपतींना सांगितलं आहे.. अमित शाहांशी माझी ओळख आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांशी ओळख आहे. अनेक उद्योगपतींची अदाणी असतील, अंबानी असतील.. टाटा-बिर्ला असतील सगळ्यांशी आमच्याही ओळखी झाल्या आहेत.' असं विधान अजित पवार यांनी यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT