Lok Sabha election 2024 : काँग्रेसने भिवंडीची जागाही गमावली, पवारांनी जाहीर केला उमेदवार

Sharad Pawar NCP 2nd List : शरद पवारांनी बीड आणि भिवंडी या दोन जागेवर उमेदआवार घोषित केले आहेत. बीडमधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेसने आणखीण एक जागा गमावली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली आहे.

lok sabha election 2024 sharad pawar declare second candidate list beed lok sabha bajarang sonavane bhiwandi suresh mhatre

प्रशांत गोमाणे

04 Apr 2024 (अपडेटेड: 04 Apr 2024, 07:46 PM)

follow google news

Sharad Pawar NCP 2nd List : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांनी बीड आणि भिवंडी या दोन जागेवर उमेदआवार घोषित केले आहेत. बीडमधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेसने आणखीण एक जागा गमावली आहे. (lok sabha election 2024 sharad pawar declare second candidate list beed lok sabha bajarang sonavane bhiwandi suresh mhatre) 

हे वाचलं का?

बीड लोकसभा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे  आणि बजरंग सोनावणे हे दोघेही इच्छुक होते. मात्र गेल्या निवडणूकीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना तगडी टक्कर दिली होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. 

हे ही वाचा : अजित पवारांनी जाहीर केला उस्मानाबादचा उमेदवार!

भिवंडी लोकसभा मतदार संघावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या दोन्ही पक्षांचा दावा होता. काँग्रेसच्या उमेदवाराला या जागेवर गेल्यावेळी लक्षणीय मतं पडली होती. त्यामुळे या जागेवर काँग्रेस दावा सांगत होती. तर शरद पवार यांच्याजवळ सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा असा तगडा उमेदवार होता. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा शरद पवारांचा आग्रह होता. अखेर शरद पवारांनी सुरेश म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब  केले आहे. त्यामुळे आता भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे उमेदवार असणार आहे. आणि आता कपिल पाटील विरूद्ध सुरेश म्हात्रे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Prakash Ambedkar : अमरावतीत नवा ट्विस्ट! आंबेडकरांनी उमेदवार घेतला मागे

दरम्यान शरद पवारांनी भिवंडीच्या जागेवर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता काँग्रेसच्या हातून भिवंडीच्या जागा देखील निसटली आहे. याआधी काँग्रेसने सांगलीच्या जागेवरही दावा सांगितला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.त्यामुळे ही जागा देखील काँग्रेसच्या हातून गेली होती. 

    follow whatsapp