Lok Sabha Election 2024: अजितदादांना धक्का... निलेश लंके ढसाढसा रडले, दिला आमदारकीचा राजीनामा!

रोहित गोळे

29 Mar 2024 (अपडेटेड: 29 Mar 2024, 10:04 PM)

Nilesh Lanke MLA Resignation: अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देत शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

follow google news

बातम्या हायलाइट

point

निलेश लंकेंनी दिला राजीनामा

point

शरद पवार गटात केला प्रवेश

point

निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

NCP Nilesh Lanke MLA Resignation Ahemadnagar Lok Sabha: अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकच्या आधीच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार निलेश लंके यांनी अखेर आज (29 मार्च) आमदरकीचा राजीनामा दिला. आपला राजीनामा देताना लंके यांना त्यांचे अश्रू रोखता आले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषणातच आपल्या राजीनामा पेश केला. त्यावेळी निलेश लंकेंना अश्रू अनावर झाले. (lok sabha election 2024 shock to ajit pawar group nilesh lanke cried resigned from mla he will contest lok sabha elections from the sharad pawar group)

हे वाचलं का?

याच राजीनाम्यासोबत निलेश लंके यांनी हे देखील जाहीर केलं की, लोकसभेसाठी ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवतील. त्यामुळे हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहेच. मात्र, याशिवाय अहमदनगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यासाठी देखील धोक्याची घंटा आहे. कारण या मतदारसंघात खासदार विखे-पाटलांबाबत बरीच नाराजी आहे. अशावेळी निलेश लंकेंसारखा उमेदवार रिंगणात उतरल्याने सुजय विखेंसाठी ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे.

निलेश लंकेला अश्रू अनावर... दादांची साथ सोडत पवारांच्या गटात!

दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की, 'आज आपल्याला.. सहा महिने बाकी असताना काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. चारच महिने ना.. म्हणजे चार महिने बाकी आहेत. तुम्हाला हे सांगत असताना माझ्या वेदना मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस हा निर्णय घेण्याची शेवटची वेळ आली.. काल दोन-तीन कार्यकर्ते आले होते. त्यावेळी बसल्या-बसल्या असं म्हटलं की, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. घेऊन टाकू.. फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारू दे..' 

'मी तुमची माफी मागतो.. तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. पण आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.'

हे ही वाचा>> Satara Lok Sabha : श्रीनिवास पाटलांची माघार, आता शरद पवारांसमोर पर्याय काय?

'आपण आमदारकीसाठी संघर्ष केला आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा आहे. मला माहिती आहे की, माझ्याबाबत एक चीड निर्माण होणार आहे. जेवढी चीड तुम्हाला निर्माण होणार आहे त्यापेक्षा दहा पट चीड, वेदना मला होत आहेत...' असं म्हणत निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले.

ते पुढे म्हणाले की, 'यामुळे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणं योग्य ठरणार आहे. आपण कुठे चुकीचं सापडतो हे तपासलं जाणार आहे. मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला.' 

'आपण जसं जिल्हा, तालुका याचं चित्र बदललं.. आता आपल्याकडून दक्षिण अहमदनगर मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा आहेत. लोकांना माझ्याकडून काय मिळवायचं.. पण त्यांच्या अपेक्षा आहेत की, आम्हाला पण तुमच्यासारखा खासदार मिळाला पाहिजे.' 

'अरे दिल्लीत जर नाही शेतकऱ्यांची बाजू मांडली ना, ना दूध दरवाढीबद्दल नाही बोललो.. मला तुम्ही सांगा ना.. शेतकऱ्यांसाठी ही लढाई जिंकणं भागच आहे.' 

'आज आपण आपल्या विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत आहे. परत एकदा मी तुमची जाहीर माफी मागतो. आपल्यावर हा निर्णय घेण्याची वेळ कोणी आणली याचाही आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे.'

हे ही वाचा>> पवारांनीही उडवली कॉलर, उदयनराजेंविरोधात पुन्हा मैदानात!

'कोणी आपल्याला बोट दाखवायला नको, कोणी आपल्याला कोर्टाची पायरी चढायला लावू नये.. आपण बाकीच्यांसारखा ड्रामा राजीनामा नाही देत.. हा राजीनामा आता लगेच विधानसभा अध्यक्षाकडे पाठवत आहे.' 

'आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली.. मनात सल होती की, अरे 83 वर्षांच्या पवार साहेबांना आपण दु:ख दिलं मधल्या काळात.. ते दु:ख भरून काढण्यासाठी साहेबांच्या हाकेला ओ देऊन.. ही नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेत आहोत.' असं निलेश लंके यावेळी म्हणाले.

 

    follow whatsapp