Lok Sabha Election 2024: भाजप-काँग्रेस किती जागा जिंकणार? 'यांनी' सांगितला फायनल आकडा!

मुंबई तक

• 08:19 PM • 27 May 2024

Lok Sabha Election 2024 Prediction: लोकसभा निवडणुकीतील जागांबाबत योगेंद्र यादव म्हणाले की, मला वाटते की, या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा म्हणजेच २७२ जागा कोणत्याही परिस्थितीत मिळतील असे वाटत नाही.

भाजप-काँग्रेस किती जागा जिंकणार?

भाजप-काँग्रेस किती जागा जिंकणार?

follow google news

Yogendra Yadav on Lok Sabha Election: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) आतापर्यंत देशात निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता केवळ सातवा म्हणजेच शेवटच्या टप्पा शिल्लक आहे. याच शेवटच्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 57 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, यावेळी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाचे सरकार स्थापन होणार आहे, हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. (lok sabha election 2024 yogendra yadav has come up with his final estimate for lok sabha elections gave so many seats to bjp congress)

हे वाचलं का?

याबाबत रोज नवनवीन दावे केले जात आहेत. काहींच्या मते, NDA पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येईल तर काही जण INDIA आघाडीला बऱ्याच जागा मिळतील असा अंदाज वर्तवत आहेत.

हे ही वाचा>> Ravindra Dhangekar : "तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, लाज कशी...", धंगेकरांचा रुद्रवतार!

दरम्यान, देशातील निवडणुकीबाबत बारकाईने अभ्यास करणारे आणि राजकीय विश्लेषक असलेले योगेंद्र यादव यांनीही लोकसभा निवडणुकीबाबत आपला अंतिम अंदाज जाहीर केला आहे. भाजपचा 400 पारचा नारा हा निव्वळ राजकीय प्रचार असल्याचे सांगत त्यांनी भाजपने मिळविलेल्या जागांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागांच्या बाबतीत योगेंद्र यादव यांचा अंदाज काय आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. 

भाजपला बहुमत मिळणं कठीण, 250 जागांवरच अडकणार गाडी?

लोकसभा निवडणुकीतील जागांबाबत योगेंद्र यादव म्हणाले की, 'मला वाटते की, या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा म्हणजेच 272 जागा कोणत्याही परिस्थितीत मिळतील असे वाटत नाही. भाजप या निवडणुकीत 250 च्या आसपास मर्यादित असू शकतो. तर भाजपप्रणित एनडीए 272 जागांचा आकडा ओलांडू शकतो किंवा नाही देखील.. पण मला याबाबत खात्री नाही.' ते म्हणाले की, 'भाजपला 303 जागा जिंकणे पूर्णपणे अशक्य आहे.'

हे ही वाचा>> भाजपला महाराष्ट्र-कर्नाटकात बसणार झटका? सरदेसाईंचा अंदाज काय?

दुसरीकडे काँग्रेसला मिळणाऱ्या जागांबाबत ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील. म्हणजे पक्षाला मागील कामगिरीपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकता येतील.' 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. 

विरोधी INDIA आघाडीच्या इतर पक्षांना सुमारे 120 ते 125 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूणच INDIA आघाडीला 220 ते 230 जागा मिळू शकतात. म्हणजे INDIA Alliance ला बहुमत मिळताना दिसत नाही.

400 पार करणे हा भाजपचा निव्वळ राजकीय प्रचार

योगेंद्र यादव म्हणाले की, 'निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि भाजप 400 पारचा नारा देत होते, मला वाटते की 400 पारचा नारा भाजपचा निव्वळ राजकीय प्रचार होता. असे निकाल कधीच येऊ शकत नाहीत हे भाजपवाल्यांनाही माहीत होते. मात्र, असे असतानाही मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी रेटण्यात आल्या. कारण देशातील मीडिया मोदीजींवर मेहरबान आहे. त्यानंतर असे सर्व्हे पुढे आले की, भाजपला 320 जागा मिळतील आणि मित्रपक्षांना 50-60 जागा मिळतील. म्हणजेच एनडीए आरामात 370-380 जागांवर पोहोचेल.'

मात्र, एवढे होऊनही मतदानाचा ट्रेंड टप्प्याटप्प्याने येऊ लागल्यावर सर्वांचा दृष्टिकोन बदलू लागला. त्यानंतर भाजपला 303 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असं म्हटलं जाऊ लागलं. पूर्व आणि उत्तरेत भाजपचे जे नुकसान होईल ते दक्षिण भारत भरून काढेल, असा युक्तिवाद केला जात आहे. पण, या गोष्टी देखील शुद्ध मूर्खपणा आहेत.

    follow whatsapp