Lok Sabha Election Phase 1 Voting : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (17 एप्रिल) संध्याकाळी संपला. या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे.
ADVERTISEMENT
पहिल्या टप्प्यातील मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 रॅली आणि 7 रोड शो केले. गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत 22 सार्वजनिक कार्यक्रम केले आहेत, ज्यात 8 रोड शो आणि 14 जाहीर सभांचा समावेश आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी काँग्रेसच्या नेत्यांनीही देशभरात सभा घेतल्या आणि रोड शो केले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक रोखे, एजन्सीचा कथित गैरवापर, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले.
आठ केंद्रीय मंत्र्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये होणार बंद
आठ केंद्रीय मंत्री - नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बल्यान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन, दोन माजी मुख्यमंत्री - बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) मतदानाचा पहिला टप्पा) आणि तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन यांच्याही जागा पणाला लागतील.
102 जागांचा 2019 मध्ये काय होता निकाल?
2019 मध्ये 102 जागांपैकी 45 जागा युपीए म्हणजे सध्याच्या इंडिया आघाडीने जिंकल्या होत्या आणि एनडीएने 41 जागा जिंकल्या होत्या.
तामिळनाडू (39), उत्तराखंड (5), अरुणाचल प्रदेश (2), मेघालय (2), अंदमान आणि निकोबार (1), मिझोराम (1), नागालँड (1), पुद्दुचेरी (1), सिक्कीम (1) आणि लक्षद्वीप (1) च्या सर्व जागांवर मतदान होणार आहे.
याशिवाय राजस्थानमध्ये 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 5, बिहारमध्ये 4, पश्चिम बंगालमध्ये 3, मणिपूरमध्ये 2, जम्मू-काश्मीर, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
ADVERTISEMENT