Madha Lok Sabha Constituency, Dhairyasheel Mohite Patil : नितीन शिंदे, सांगोला : माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीनंतर हा तिढा अद्याप सुटला नाही. कारण फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीनंतर काल रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Nimbalkar) सोशल मीडियावर पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील( Dhairyasheel Mohite Patil) देखील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी जनतेच्या भेटीगाठी सूरू केल्या आहेत. त्यामुळे मोहिते पाटील देखील माघार घेण्याच्या तयारीत नसून त्यांनी पुढचा प्लॅन आखायला सुरुवात केली आहे. (madha lok sabha constituencye ranjeetsingh nimbalkar bjp candidate dhairysheel mohite patil ramraje nimbalkar devendra fadnavis sagar bunglow meeting)
ADVERTISEMENT
भाजपने माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदावारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीवरून रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे माढ्यात तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांनी मंगळवारी प्रयत्न केले होते.मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे माढ्यात चित्र आहे.
हे ही वाचा : अजित पवारांसोबत वाद... हर्षवर्धन पाटील फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा
दरम्यान आज माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी जनतेच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. करमाळा, माढा, सांगोला या ठिकाणी मोहिते पाटलांनी जनतेची मते जाणून घेतली. सांगोल्यामधून स्वतः धैर्यशील मोहिते पाटील जनतेच्या भेटीगाठी घेत आहे. तर माढयात धैर्यशील मोहिते पाटील यांची पत्नी शीतल देवी मोहिते पाटील प्रचार करीत आहे. तर करमाळा येथे शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी शिवसेना नेते शिवाजी सावंत यांची भेट घेतली आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांच्या या भेटीगाठी दरम्यान मतदारांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता मतदारांच्या या आवाहनाला धैर्यशील मोहिते पाटील काय प्रतिसाद देतात. हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
यावेळी मुंबई तकशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, जनतेच मते जाणून घेण्यासाठी फिरतोय. मंगळवारच्या सागर बंगल्यावरील बैठकीवर बोलताना मोहिते पाटील म्हणाले की, ''रामराजे काय बोलले हे मला माहित नाही. पण राजे साहेब आणि मोठे दादा जो निर्णय घ्यायचा तो घेतील. सध्या मी जनतेच्या भावना जाणून घेतोय त्यानंतर उमेदवारीबाबत सांगेन, असे सूचक विधान धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया देताना केले. त्यामुळे मोहिते पाटलांनी अद्याप माघार घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हे ही वाचा : Maha Vikas Aghadi : 23-14-6... काँग्रेसने ठरवला मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला!
मोहिते पाटलांनी उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या तुतारीवर लढण्याचीही कार्यकर्त्यांकडून साद घातली जात आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील तुतारी हाती घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT