Madha Lok Sabha Constituency, Pravin Gaikwad : माढ्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नवनवीन ट्वि्स्ट पाहायला मिळतायत. एकीकडे भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र या उमेदवारीला विरोध होत आहे. तर दुसरीकडे माढ्यात शरद पवार उमेदवारांचे नवनवीन प्रयोग करून पाहत आहेत. त्यात आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला नवीन उमेदवार सापडला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) हे पवारांचे नवीन उमेदवार असणार असून ते माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. (madha lok sabha election 2024 pravin gaikwad candidancy sharad pawar ncp dhairyshil mohite patil bjp candidate ranjitsingh nimbalkar)
ADVERTISEMENT
माढा लोकसभा मतदार संघासाठी शरद पवार उमेदवार शोधायत. यासाठी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या आहेत. या भेटीगाठी दरम्यान आता त्यांचा उमेदवार ठरल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड हे माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत.
हे ही वाचा : "संज्या, नटरंगी नाच्या...", भाजप आमदार राऊतांवर प्रचंड संतापला
शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना प्रवीण गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता दिल्लीत शरद पवारांसोबत प्रवीण गायकवाड यांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. या भेटीतच प्रवीण गायकवाड यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यावरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे माढ्यातून प्रविण गायकवाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. याबाबत येत्या दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे .
मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत. त्यांनी जर तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर ते निवडून येतील. मात्र जर त्यांनी तुतारी हाती घेतली नाही तर मी स्वत: माढ्यातून लढण्यास तयार असल्याचं शरद पवारांना सांगितलं आहे. त्यांनी जर लवकर निर्णय घेतला नाही तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Satara Lok Sabha 2024 : उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरणार मैदानात?
भापजने रणजितसिंह निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत. तसेच मोहिते पाटलांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह देखील आहे. अमोल कोल्हे यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती. त्यामुळे मोहिते पाटलांना देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. त्यात आता प्रवीण गायकवाड यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT