Maha Vikas Aghadi : शिवसेना 22, राष्ट्रवादी 10, काँग्रेस 16; मविआत 'वंचित'चं काय?

भागवत हिरेकर

• 08:14 AM • 18 Mar 2024

Maha Vikas Aghadi Lok Sabha 2024 Seats Allocation : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा झाल्यानंतर याची घोषणा होऊ शकते.

वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सोडणार जागा.

महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप अंतिम झाले असून, वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयानंतर याची घोषणा होणार आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

point

शिवसेनेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता

point

वंचित बहुजन आघाडीला अकोलाबरोबर नांदेड?

Maha Vikas Aghadi Lok Sabha 2024 Seats Sharing : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. खासदार संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला असून, वंचित बहुजन आघाडीमुळे घोषणा लांबणीवर पडली आहे. मविआचा लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून, यात सर्वाधिक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. 'लोकमत'ने मविआच्या जागावाटपाबद्दल वृत्त दिले असून, त्यात वंचितसाठी तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातून जागा देणार असल्याचे म्हटले आहे. (Maha Vikas Aghadi Seats Sharing for Lok Sabha elections 2024)

हे वाचलं का?

महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच होता, तो आता सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 22 जागा, काँग्रेस 16 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा असे जागावाटप ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. 

रामटेक काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंच्या शिवसेनेला

काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवरून पेच होता. कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली आहे. त्याबदल्यात सांगलीची जागा काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला दिली आहे. दुसरीकडे रामटेकच्या जागेवरूनही पेच होता, पण या जागेवरून काँग्रेस उमेदवार देणार असा निर्णय झाला आहे.

हेही वाचा >> "माझ्या आईला रडून सांगत होते की,...", अशोक चव्हाणांचं नाव न घेता गौप्यस्फोट 

दुसरीकडे भिवंडी मतदारसंघाचा तिढाही सुटला आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार असून, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना ही जागा दिली जाणार आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार म्हणून निवडून आले होते.

हेही वाचा >> माढ्यात प्रचंड राडा! भाजप कार्यकर्त्यांनीच अडवली गिरीश महाजनांची गाडी

वंचित बहुजन आघाडीचे काय?

फॉर्म्युल्यानुसार वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काही जागा देणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना तसा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती असून, अकोला लोकसभा मतदारसंघाबरोबरच नांदेडची जागाही वंचितला दिली जाऊ शकते. वंचितला महाविकास आघाडी चार ते पाच जागा देण्यास तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

    follow whatsapp