Maharashtra Exit Poll Result 2024 Live : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल हाती यायला सुरूवात झाली आहे.या एक्झिट पोलमध्ये बीडमधन पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, तर नगरमध्ये बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे.टीव्ही 9 च्या पोपस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra-exit-poll-result-2024-live-bjp-shiv-sena-uddhav-ncp-seats-aajtak-india-today-axis-chanakya-cvoter-opinion-poll-results-lok-sabha-election)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हाती यायला सुरूवात झाली आहे. टीव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार हे उमेदवार आघाडीवर आहेत.
बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर आहेत.
नगरमधून शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर आहेत, तर भाजपचे सुजय विखे पिछाडीवर आहेत.
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत, असा अंदाज पोलस्ट्राटने वर्तवला आहे.
अमरावतीतून नवनीत राणा आघाडीवर आहेत, तर बळवंत वानखेडे आणि दिनेश बूब पिछाडीवर आहेत.
छत्रतपी संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरै आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे संदिपान भूमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील पिछाडीवर आहत.
माढ्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचा अंदाज आहे.तर भाजरचे रणजीत सिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत.
जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे कल्याण काळे पिछाडीवर आहे.
सोलापुरमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भापजचे राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.
पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपला 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळताना एक्झिट पोलमध्ये दिसतायत. तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या गटाला एकही जागा मिळाली नसल्याचे पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे.
साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आगाडीवर आहेत.तर भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.
नागपूरातून भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर आहे.
चंद्रपुरमधून प्रतिभा धानोरकर हे आघाडीवर आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे विनायत राऊत पिछाडीवर आहेत.
एक्झिट पोलच्या निकालाचा अंदाज
महाराष्ट्र 48
भाजप : 18
शिवसेना : 04
राष्ट्रवादी (अजित पवार) : 00
काँग्रेस : 05
ठाकरे गट : 14
राष्ट्रवादी (शरद पवार) : 06
पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार एक जागा ही अपक्षांकडे जाण्याचा अंदाज आहे.
सांगलीतून अपक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
परभणीतून ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पिछा़डीवर आहेत.
ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर आहेत.तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के पिछाडीवर आहे.
नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर आघाडीवर, तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण पिछाडीवर आहे.
पोलस्ट्राटच्या सर्वेनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहेत. तर महायुतीच्या जागा घटण्याची चिन्हे आहेत.
पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे आहेत. तर महायुतीच्या जागा घटण्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरेल तर महायुतीचे 45 पारचं स्वप्न भंगणार आहे.
धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत.तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील पिछाडीवर आहेत.
पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार नाशिकमधून ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाझे आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अपक्ष शांतिगिरी महाराज पिछाडीवर आहेत.
दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. तर भाजपच्या भारती पवार पिछाडीवर जात असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
एक्झिट पोलनुसार कल्याणमधुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे वैशाली दरेकर पिछाडीवर आहेत.
रायगडमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते आघाडीवर आहेत. तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे पिछाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत.
धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत.तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर आहेत.
जळगावातून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे करण पवार पिछाडीवर आहे.
पुण्यात भापजचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे पिछाडीवर आहेत.
यवतमाळ वाशिममधुन ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत.
शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पिछाडीवर आहेत.
बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव पिछाडीवर आहेत.
ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे मिहीर कोटेचा पिछाडीवर आहेत.
भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे बाळ्या मामा आणि अपक्ष निलेश सांबरे पिछाडीवर आहेत.
मावळमधून शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पिछाड़ीवर आहेत.
अकोल्यातुन भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत. वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष अभय पाटील पिछाडीवर आहेत.
शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर असल्याचा अंदाज आहे. तर अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पिछाडीवर आहेत.
वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस विजयी होण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवला आहे. तर शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर आहेत.
रावेरमधुन भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत.
भंडारा-गोदियातून भापजचे सुनील मेंढे हे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रशांत पडोळे पिछाडीवर आहेत.
मुंबई दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत.
रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे हे आघाडीवर आहेत. काँग्रेसेचे श्यामकुमार बर्वे पिछाडीवर आहे.
हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर पिछाडीवर आहे.
हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे विशाल पाटील पिछाडीवर आहेत.
लातूरमधून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुधाकर श्रृंगारे पिछाडीवर आहेत.
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहे. शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.
पालघरमधून भाजपचे डॉ. हेमंत सावरा आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी पिछाडीवर आहे.
ADVERTISEMENT