Lok Sabaha Election 2024 : 'या' एका जागेमुळे ठाकरे-शिंदेंची वाढली कटकट!

मुंबई तक

• 11:42 AM • 29 Mar 2024

Nashik Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नाशिक लोकसभा मतदारसंघामुळे कसे कात्रीत सापडले आहेत?

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर या लोकसभा मतदारसंघात मोठा गुंता निर्माण झाला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत युतीमध्ये शिवसेनेकडे राहिला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा पेच

point

एकनाथ शिंदेंचे खासदार नाराज

point

उद्धव ठाकरेंच्या पक्षात नाराजी

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागांचा घोळ अजूनही सुटलेला नाही. त्यातही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एका मतदारसंघाने कटकट वाढवली आहे आणि हा मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा! ठाकरे-शिंदेंची डोकेदुखी का वाढलीये, तेच जाणून घ्या. (Nashik Lok Sabha Election 2024 Latest News)

हे वाचलं का?

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत युतीमध्ये शिवसेनेकडे राहिला आहे, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे. पण राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर या लोकसभा मतदारसंघात मोठा गुंता निर्माण झाला आहे. 

महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेने या मतदारसंघातून उमेदवारही जाहीर केला आहे. त्यानंतर ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची कटकट वाढली आहे. शिंदे कसे कात्रीत सापडलेत ते आधी बघुयात...

विद्ममान आमदार शिवसेनेचा, राष्ट्र्रवादी-भाजपचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे या जागेसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे भाजपनेही यावर दावा केला आहे. आता झालंय असं की, भाजपने पुन्हा माधवं सूत्राकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघातून छगन भुजबळ यांना उतरवण्याचा प्रयत्न आहे. 

छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत. राज्यात मराठा आरक्षणामुळे मराठा मतदार नाराज आहे. त्यामुळे ओबीसी मते अधिकाधिक आपल्या बाजूला घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. यात वंजारी समाजातून येत असलेल्या आणि चांगला जनाधार असलेल्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महादेव जानकर यांनाही उतरवण्यात येणार आहे. आता भुजबळांसाठी मतदारसंघ सोडला, तर हेमंत गोडसेंना आपला मतदारसंघ सोडावा लागणार आहे, त्यामुळे ते एकनाथ शिंदेंवर दबाव टाकताना दिसत आहे. यामुळे शिंदे कात्रीत सापडले आहेत. 

ठाकरेंची काय झाली आहे अडचण?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. वाजे सिन्नरचे माजी आमदार आहेत. पण, वाजेंना उमेदवारी मिळाल्याने तिकीट मिळण्याच्या शर्यतीत असलेल्या विजय करंजकर यांची निराशा झाली आहे. त्यांची नाराजी लपवू शकलेले नाहीत.

 

ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक लोकसभा संघटक असलेले विजय करंजकर नाराज असून, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. "मैं जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ", असे करंजकर यांनी म्हटले आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पोस्टवरून संजय राऊत यांना स्थान देण्यात आलेले नाही. करंजकर आता ठाकरेंची भेटही घेणार आहेत, पण त्यांच्या नाराजीचा फटक वाजे बसू शकतो आणि त्यामुळेच ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. 

    follow whatsapp