Nitin Gadkari : मुनगंटीवारांना पॉवरफुल शिलाजीत देऊ की काम एकदम जोरात होईल, विकासाचं काम: गडकरी

मुंबई तक

• 06:37 PM • 06 Apr 2024

Nitin Gadkari Big statement On Sudhir Mungantiwar : सभेत मुनगंटीवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना नितीन गडकरी म्हणाले की, ''मुनगंटीवार जर निवडून आले, तर त्यांच्यामागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहील. त्यांना असे पॉवरफुल शिलाजीत देऊ की काम एकदम जोरात होईल....काम म्हणजे विकासकामे बरं का...''असे म्हणताच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

nitin gadkari big statement on sudhir mungantiwar chandrapur lok sabha election 2024 shilajeet chandrapur rajura rally

''सुधीर मुनगंटीवार जर निवडून आले, तर त्यांच्यामागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहील.

follow google news

Nitin Gadkari Big statement On Sudhir Mungantiwar : विकास राजूरकर, चंद्रपूर : ''सुधीर मुनगंटीवार जर निवडून आले, तर त्यांच्यामागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहील. त्यांना असे पॉवरफुल शिलाजीत देऊ की काम एकदम जोरात होईल...काम म्हणजे विकासकामे बरं का...'' असे नितीन गडकरी (Nitin  Gadkari) म्हणताच एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट देखील झाला. गडकरी यांच्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.  (nitin gadkari big statement on sudhir mungantiwar chandrapur lok sabha election 2024 shilajeet chandrapur rajura rally) 

हे वाचलं का?

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार आहेत. मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी राजूरा येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत मुनगंटीवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना नितीन गडकरी म्हणाले की, ''मुनगंटीवार जर निवडून आले, तर त्यांच्यामागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहील. त्यांना असे पॉवरफुल शिलाजीत देऊ की काम एकदम जोरात होईल....काम म्हणजे विकासकामे बरं का...''असे म्हणताच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे ही वाचा  : 'जनावरही सांगेल हा जिल्हा...', कदमांनी राऊतांना डिवचलं!

शरद जोशी यांचा मी एक अनुयायी आहे.त्यांच्या विचारांचा आधारावर एक जीवनदृष्टी तयार केली आहे. त्यांनी सांगितलेले की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. साखरेचा भाव ब्राजील मध्ये ठरतो.मक्याचा भाव अमेरिकेत ठरते.तेलाचा भाव मलेशिलियात ठरत असते. त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये क्रॉप पटर्न विचारपूर्वक निवड केली पाहिजे.

धानाचा तनसा पासून इंधन तयार करणार.जेव्हा राजुऱ्यात विमाने उतरतील तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन त्या विमानात जाईल असा विश्वास मी तुम्हाला सांगतो.तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही.मी फोकनाड बोलणारा नेता नाही, जो करता हू, वही बोलता हू, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

    follow whatsapp