Chandrapur Lok Sabha : "आपली उमेदवारी फिक्स", काँग्रेसच्या धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये 'संघर्ष'

योगेश पांडे

19 Mar 2024 (अपडेटेड: 19 Mar 2024, 11:36 AM)

Chandrapur lok sabha 2024 Latest Updates : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेससमोर पेच... प्रतिभा धानोरकर-शिवानी वडेट्टीवार तिकिटासाठी आक्रमक

शिवानी वडेट्टीवार की, प्रतिभा धानोरकर, काँग्रेस कुणाला देणार तिकीट?

शिवानी वडेट्टीवार यांनी मतदारसंघावर दावा केल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट.

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ २०२४

point

सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला देणार उमेदवारी?

point

प्रतिभा धानोरकर, शिवानी वडेट्टीवार उमेदवारीसाठी आक्रमक

Pratibha Dhanorkar Shivani Wadettiwar : भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे. त्यामुळे येथून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता असताना काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण दोन महिला नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून खासदार राहिलेले स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा केला आहे. हा वाद नेमका काय, हेच जाणून घ्या...

हे वाचलं का?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. गेल्यावेळी बाळू धानोरकर या लोकसभा मतदारसंघातून निवडू आले होते. त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आता या जागेवरून उमेदवार कोण असणार, याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी दावा केला. त्या काय म्हणालेल्या ते पहा

Lok Sabha Elections 2024 : शिवानी वडेट्टीवार यांची पोस्ट

"आता संसदेतूनच आवाज उठवणार... गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरे तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात करायची होती. मात्र, लोकशाही संपवू पाहणाऱ्या ह्या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार!

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेजी, सोनिया गांधीजी संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे.

हेही वाचा >> 'माझ्या कोर्टात नियम पाळावेच लागतील', सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा चढला पारा 

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले. 

संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे असून, त्यांचा निर्णय मला मान्य असेल." 

शिवानी वडेट्टीवार यांची लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दलची पोस्ट.

शिवानी वडेट्टीवार यांच्या पोस्टनंतर धानोरकरांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. प्रतिभा धानोरकर या मतदारसंघातून आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा करत आहेत. प्रतिभा धानोरकरांनी एका पोस्टमधून त्यांचीही भूमिकाही मांडली आहे. 

Congress : प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट 

"माननीय दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्यावर अपार प्रेम करणारे आपण सर्व मित्रहो... आदरणीय बाळूभाऊंच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे. 

आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. काळ फिरत राहतो, थांबणे हा त्याचा धर्म नाही! पण तरीही मागील लोकसभा निवडणुकीत अगदी निवडणुका तोंडावर असताना आदरणीय बाळूभाऊ यांना पक्षाने उमेदवारी दिली होती; आणि त्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांनी गाजवलेले मैदान निकालाच्या रुपाने सगळ्या जगाने पाहिले होते.

हेही वाचा >> महायुतीत MNSच्या एंट्रीने कोणत्या मतदारसंघात फायदा होणार?

आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे."

सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात कोण?

भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसकडून कुणाला उतरवले जाणार याची प्रतिक्षा आहे. त्यात दोन महिला नेत्या तिकिटासाठी प्रयत्न करत असल्याने ऐनवेळी कोण वरचढ ठरणार, हे यादी आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण, या संघर्षाने सध्यातरी काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

    follow whatsapp