Prithviraj Chavan : 'लोकसभेनंतर महाराष्ट्रातील 2 पक्ष...', चव्हाणांच्या विधानाने खळबळ

प्रशांत गोमाणे

06 May 2024 (अपडेटेड: 06 May 2024, 02:32 PM)

Prithviraj Chavan, Lok Sabha Election 2024 : जनतेमध्ये मोदी नको अशी सुप्त लाट आहे. त्यामुळेच मोदींची धावपळ चालली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पण तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहिरनाम्याची चौकशी का करताय? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

prithviraj chavan big statement on maharashtra politics lok sabha election 2024 two party disappear in maharashtra

जनतेमध्ये मोदी नको अशी सुप्त लाट आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसच्या जाहिरनाम्याची चौकशी का करताय?

point

तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा

point

भाजपला डोळ्यासमोर पराभव दिसतोय

Prithviraj Chavan, Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सूरू आहे. या प्रचारात काही खळबळजनक दावे केले जातायत. असाच दावा आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात सहा पक्ष एकमेकांविरूद्ध ठाकलेले आहेत. या सहापैकी दोन पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर लोप पावतील. एकतर हे पक्ष कुठेतरी मर्ज होतील किंवा संपूष्टात येतील. पण हे दोन पक्ष दिसणार नाहीत, असा खळबजनक दावा पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. चव्हाणांच्या या दाव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  (prithviraj chavan big statement on maharashtra politics lok sabha election 2024 two party disappear in maharashtra) 

हे वाचलं का?

पृथ्वीराज चव्हाण एबीपी माझाशी बोलत होते.यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जनतेमध्ये मोदी नको अशी सुप्त लाट आहे. त्यामुळेच मोदींची धावपळ चालली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पण तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहिरनाम्याची चौकशी का करताय? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. तुमचं सरकार येणार असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. पण ते गोंधळलेल्या परिस्थितीत आहे त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसतोय. म्हणून काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय ते बोलतायत, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली. 

हे ही वाचा : 'त्या' विधानामुळे 'मविआ'त धस्स्स! उद्धव ठाकरेंनी अखेर सोडलं मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर बोलतायत. त्यामुळे कुठेतरी 10 वर्ष सत्तेत असलेला व्यक्ती आपल्या 10 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतच नाही. पण आम्ही जे 10 वर्षात केल नाही ते आता करू का. यावर काहीच बोलत नाही, असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात आज सहा पक्ष आहेत. तीन एका बाजूला आणि तीन दुसऱ्या बाजूला. हे सहा पक्ष एकमेकांविरूद्ध उभे ठाकलेले आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर या सहापैकी किमान दोन पक्ष तरी लोप पावतील. एक तर दोन पक्ष लोप पावतील किंवा संपुष्टात येतील. पक्षातील नेते इकडे तिकडे पळतील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

हे ही वाचा : ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव

दरम्यान या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? असा सवाल पत्रकाराने पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला होता. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे बहुमत येईल. महाविकास आघाडीचा मेजॉरीटीच्या जागा येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 

    follow whatsapp