Farmer became millionaire overnight: यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील एक शेतकरी चक्क एका रात्रीत करोडपती बनला आणि यासाठी कारणीभूत ठरलं फक्त एक झाड. कोणाचाही विश्वास न बसणारी ही घटना पुसद तहसीलमधील खुर्शी गावात घडली. या गावात केशव शिंदे नावाच्या एका शेतकऱ्याचे त्याच्या 7 एकर शेतीमध्ये असणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाने त्याचे नशीबच बदलून टाकलं
ADVERTISEMENT
शेतात रक्तचंदनाचं झाड पण शिंदे कुटुंबाला माहितीच नव्हतं
खरंतर, 2013 ते 2014 पर्यंत शिंदे परिवाराला त्यांच्या शेतात असलेलं एक झाड रक्तचंदन प्रजातीचं असल्याचं माहितंच नव्हतं. याच दरम्यान, रेल्वेचं एक सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणात कर्नाटकातील काही अधिकाऱ्यांनी तेथील रेल्वे मार्गाचं निरीक्षण केलं. यावेळी त्या अधिकाऱ्यांनी शेतात असलेलं ते झाड रक्तचंदनाचं असल्याचं शिंदे कुटुंबियांना सांगितलं. बाजारात लाखोंची किंमत असलेल्या या झाडाविषयी ऐकून शिंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला.
हे ही वाचा: 64 विषयांमध्ये मास्टर, अनेक रेकॉर्ड्स, स्वत:चं ग्रंथालय... बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या 22 गोष्टी नक्की जाणून घ्या
रेल्वेकडून झाडाची भरपाई देण्यास नकार
यानंतर, रेल्वेने ती जमीन ताब्यात घेतली मात्र, तिथे असलेल्या त्या झाडाची किंमत देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी त्या झाडाचे त्यांच्या पद्धतीने मूल्यांकन केले आणि यामध्ये त्या झाडाची किंमत सुमारे 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची सांगितली. मात्र, रेल्वेने या झाडाची किंमत देण्यास नकार दिल्यावर हे प्रकरण कोर्टात घेऊन जाण्याचा निर्णय शिंदे कुटुंबियांनी घेतला.
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंत पोहोचलं. न्यायालयाने मध्य रेल्वेला झाडाच्या किंमतीच्या बदल्यात 1 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच, न्यायालयाने या रकमेतून 50 लाख रुपये शिंदे कुटुंबियांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आणि त्यांना ही रक्कम काढण्याची परवानगीही दिली. यासोबतच उर्वरित किंमतीचे योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्याला संपूर्ण भरपाई देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
हे ही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'या' तीन लोकांना मानलं गुरु; आत्मकथेत कुणाच्या नावाचा उल्लेख?
शिंदे कुटुंबियांच्या मते, सुरुवातीला त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन एका खाजगी इंजिनिअरकडून करून घेतले होते, परंतु मुल्यांकनात झाडाची जास्त किंमत दिसल्यामुळे रेल्वेने त्यास नकार दिला. यानंतर कुटुंबाने हा खटला उच्च न्यायालयात सादर केला. सुमारे 100 वर्षे जुन्या अशा या मोठ्या लाल चंदनाच्या झाडाच्या बदल्यात, मध्य रेल्वेने आता 1 कोटी रुपये जमा केले आहेत आणि यापैकी 50 लाख रुपये रक्कम काढण्याची परवानगी शिंदे कुटुंबियांना देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
