'भावा दरवाजा तर बंद कर', OYO च्या रुमचा दरवाजा बंद करायला विसरले अन्... तो Video व्हायरल

सध्या, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच OYO रुममधील एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे जोडपं रुमचा दरवाजा बंद करणं विसरतं आणि याचं त्यांना भानही नसतं.

Viral Video

Viral Video

मुंबई तक

• 08:03 PM • 14 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

OYO रुममधील कपलचा व्हिडीओ व्हायरल

point

कपल OYO रुमचा दरवाजा बंद करायलाच विसरले

point

OYO रुममध्ये वेळ घालवताना जोडप्याला मेट्रो स्टेशनवरील मुलाने पाहिलं

OYO Viral Video: आजकाल सोशल मीडियावर काही मजेशीर तर काही धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रामाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे अनेकदा परिसरात वावरताना लोकांच्या निष्काळजीपणामुळे काही गोष्टी या चर्चेचं कारण बनतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरंतर, एक कपल OYO हॉटेलमध्ये तर गेलं.. मात्र, त्यांनी आपल्या प्रायव्हेसीकडेच दुर्लक्ष केलं. त्यांच्या या चुकीमुळे त्यांचा प्रायव्हेट टाइम हा इतर लोकांसाठी मात्र एक 'लाइव्ह शो' बनला. 

हे वाचलं का?

OYO हॉटेलमधील रुमचा दरवाजा राहिला उघडा

या व्हायरल व्हिडिओमध्ये, मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या OYO हॉटेलची एक खोली दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, खोलीच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे आणि त्यात एक कपल रोमान्स करत होते. परंतु, मेट्रो स्टेशनवर उभे असलेले लोक त्यांना पाहत आहेत याचं त्यांना भानही नव्हतं.

हे ही वाचा: M. Com ते पुण्याचा कुख्यात डॉन.. स्वत:ला 'BOSS' म्हणवून घेणारा निलेश घायवळ आहे तरी कोण?

यादरम्यान, मेट्रो स्टेशनवर उभ्या असलेल्या एका मुलाने प्लॅटफॉर्मवरुन जोरात हाक मारली आणि सांगितलं, "भावा, दरवाजा बंद कर." त्या मुलाचा आवाज ऐकून खोलीतील ते कपल भानावर आले आणि त्यांनी लगेच दरवाजा बंद केला. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

हे ही वाचा: MS Dhoni Out Controversy: धोनीला बाद दिलं अन् गदारोळ! 'ते' दिसलं तरी थर्ड अंपायरने का बदलला नाही निर्णय?

सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्स व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. काही लोक याला 'OYO ओपन थिएटर' म्हणत आहेत तर काही जण 'तिकिटांसह एक रोमँटिक शो' म्हणत आहेत. यासोबतच नेटकऱ्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @mahiiii._.17 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. मुंबई Tak कोणत्याही दाव्याची सत्यता पुष्टी करत नाही.

    follow whatsapp