Lok Sabha : मोदींवर प्रचंड मोठा आरोप, राहुल गांधीनी केली जेपीसी चौकशीची मागणी

Rahul Gandhi big allegation : शेअर बाजारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.यासोबत नरेंद्र मोदी , अमित शाह, निर्मला सीतारामण आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टरची जेपीसीमार्फत चौकशीची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

 शेअर बाजारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

rahul gandhi big allegation stock market scam narendra modi amit shah jpc inquiry

मुंबई तक

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 06:39 PM)

follow google news

Rahul Gandhi big allegation : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारावर (Stock Market) टीपण्णी केली होती. यामध्ये मोदी, शाह आणि अर्थमंत्र्यांनी नागरीकांना गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. यावेळी एक्झिट पोलच्या दिवशी मार्केट वर गेलं होतं तर निकालाच्या दिवशी पडलं होतं. त्यामुळे शेअर बाजारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.यासोबत नरेंद्र मोदी , अमित शाह, निर्मला सीतारामण आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टरची जेपीसीमार्फत चौकशीची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. (rahul gandhi big allegation stock market scam narendra modi amit shah jpc inquiry) 

हे वाचलं का?

राहुल गांधी यांनी अचानक पत्रकार परीषद घेऊन मोदी शहांवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी मोदी शहा यांनी शेअर बाजारावर कोणत्या दिवशी काय प्रतिक्रिया देण्यात आली याची सुरुवातीला माहिती दिली. 13 मेला गृहमंत्री अमित शाह यांनी 4 जून आधी शेअर खरेदी करा असे आवाहन जनतेला केल्याचे राहुल गांधींनी सांगितले. त्यानंतर 19 मेला नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजार सर्व रेकॉर्ड मोडेल असे विधान केले होते.

हे ही वाचा : Eknath Shinde : मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री?

या घडामोडीनंतर 1 जूनला माध्यम खोटे एक्झिट पोल जाहीर करतात. विशेष म्हणजे,  भाजपचा ऑफिसीअल सर्वे सांगतो भाजपला 220 जागा मिळतील असा अंदाज होता. ही माहिती भाजप नेत्यांकडे होती. 3 जूनला शेअर बाजार सर्व रेकॉर्ड मोडतो आणि 4 जूनना शेअर बाजार पडतं, असे राहुल गांधी यांनी सांगितलं.

या दरम्यान 31 मेला मोठी गुंतवणूक झाली. हजारो करोड रूपये इकडे गुंतवले आहेत. फॉरेस्ट इन्व्हेस्ट गुंतवणूक करतात. त्यानंतर 30 लाख करोडचं नुकसान होतं.  रिटेल इन्व्हेंस्टरचा नुकसान होत. हा भारताच्या शेअर बाजारातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

हे ही वाचा : मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले?

या आरोपानंतर राहुल गांधी यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. मोदी आणि शहा यांनी जनतेला गुंतवणुकीचा सल्ला का दिला? हे त्यांचं काम होतं का? दोन्ही मुलाखती अदाणींच्या चँनेल्सना दिल्या होत्या. त्यांच्यावर सेबीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे यात त्यांचा काय रोल आहे? भाजपचे एक्झिट पोस्टर्स आणि फॉरेन डायरेक्ट इन्ह्वेस्टमेंटची भूमिका काय? त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांची जेपीसी चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. 
 

    follow whatsapp