Raj Thackeray : 'वडील चोरले म्हणता मग...', अंधारेंचा व्हिडिओ दाखवून ठाकरेंवर टीका; राज ठाकरे कडाडले

प्रशांत गोमाणे

• 10:28 PM • 12 May 2024

Raj Thackeray Criticize Uddhav Thackeray: आज जे बोलतायत आमचा पक्ष फोडला, तुम्ही सगळे एकत्र आघाडीत बसला आहात, त्यांनी एकमेकांकडे बघाव. आपण काय उद्योग केला. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते. तेव्हा काय नाही वाटलं का? मागितले असते तर दिले असते', असा हल्ला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

raj thackeray criticize udhhav thackeray thane rally lok sabha election 2024 shrikant shinde naresh mhaske

बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं

follow google news

Raj Thackeray Criticize Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' दाखवत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 'माझे वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं', असा सवाल करत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.

हे वाचलं का?

ठाण्याचे शिवसेनचे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'फोडाफोडीचे राजकारण मला मान्य झालं नाही आणि होणार नाही. पण आज जे बोलतायत आमचा पक्ष फोडला, तुम्ही सगळे एकत्र आघाडीत बसला आहात, त्यांनी एकमेकांकडे बघाव. आपण काय उद्योग केला. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते. तेव्हा काय नाही वाटलं का? मागितले असते तर दिले असते',  असा हल्ला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर चढवला. 

हे ही वाचा : ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना का दिली? फडणवीसांचा अखेर खुलासा

राज ठाकरे यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'माझे वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं. म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावर लढणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीच्या तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता, पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे सांगता,' असा सवाल राज ठाकरे यांनी सभेतून केला आहे.

तसेच ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या भुजबळांसोबत तुम्ही  भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर एकाच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात. तेव्हा वाटलं नाही माझ्या वडिलांना अटक करणाऱ्यांसोबत मी बसणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

हे ही वाचा : "...मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही?", आव्हाडांचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

'पवारांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केलं'

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. मग पुलोद स्थापण केलं. त्यानंतर 1991 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं. त्याच्यानंतर नारायण राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा शिवसेना फोडली, असा महाराष्ट्रातील फोडाफोडीचा इतिहास राज ठाकरेंनी सांगितला. 

    follow whatsapp