Rahul Gandhi: 'मोदीजी ते 5 कोटी टेम्पोत कुणी पाठवले?'; राहुल गांधींनी विनोद तावडेंचा 'तो' व्हिडीओ केला व्हायरल

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 06:28 PM)

Rahul Gandhi On Pm Narendra Modi : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे गोत्यात सापडले.

Rahul Gandhi On Pm Narendra Modi

Rahul Gandhi On Pm Narendra Modi

follow google news

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

point

विनोद तावडेंचा 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

राहुल गांधी ट्वीटरवर नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi On Pm Narendra Modi : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे गोत्यात सापडले. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेराव घातला आणि त्यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. तावडेंच्या बॅगेतून पैसे आणि लाल डायरी सापडल्याचं समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणाची दखल घेत विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी जी, हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून काढले? जनतेचा पैसे लुटून टेम्पोतून कोणी पाठवले? असा थेट सवाल राहुल गांधींनी एक्सच्या माध्यमातून मोदींना केला आहे. 

हे वाचलं का?

काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे महाराष्ट्रात एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. विनोद तावडे बॅगेत पैसे भरून आले होते आणि तिथे लोकांना बोलावून पैसे वाटत होते. ही बातमी जनेतला माहित झाल्यावर तिथे मोठा राडा झाला. पैशांसोबत विनोद तावडेंचे अनेक व्हिडीओ...

हे ही वाचा >>  Uddhav Thackeray On Vinod Tawde: "तावडेंनी आतापर्यंतची सरकारं कशी पाडली...", उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही विनोद तावडे 'कॅश फॉर वोट' प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. खरगेंनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं, "मोदी जी महाराष्ट्राला Money Power आणि Muscle Power ने 'SAFE' बनवत आहेत. एकीकडे राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर जीवघेणा हल्ला होतो. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते 5 कोटींच्या कॅशसोबत रंगेहात पकडले जातात. 

हे ही वाचा >> Vinod Tawde Video: विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल

विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याच्या आरोपावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विनोद तावडेंकडून एक डायरी जप्त केली आहे. 10 कोटी रुपये आधीच वाटले गेले आहेत, असं आम्हाला सांगण्यात आलंय. कालही त्यांच्याकडून 5 कोटींची रक्कम जमा केली होती. निवडणूक आयोगाने भाजपसाठी नवीन नियम बनवला नसेल, अशी मला आशा आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. 

    follow whatsapp