2024 Live Konkan Assembly election 2024: सिंधुदुर्ग: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यात सर्वत्र मतदान होत आहे. ठाणे आणि कोकण विभागातील एकूण 39 मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे इथे त्यांची कामगिरी कशी राहते आणि शिवसेना (ठाकरे गट) कशी टक्कर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
कोकण विभागात विधानसभेच्या एकूण 39 जागा असून त्यापैकी अनेक जागी शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) अशी थेट लढत आहे. तसंच कोकणात कोणाची शिवसेना सर्वात वरचढ ठरणार हे देखील या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा>> Supriya Sule: टेक्सटाइल पार्कमध्ये आईला अडवलं, सुप्रिया सुळेंच्या जिव्हारी लागलं.. अजितदादांना भडाभडा सुनावलं!
लोकसभा निवडणुकीत कोकणात आणि विशेषत: तळ कोकणात शिवसेना (ठाकरे गट) यांना अजिबात यश मिळालं नाही. त्यामुळेच या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्याची गरज ठाकरे गटाला आहे. अशावेळी कोकणी माणूस कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कोकण विभागात नेमकं किती टक्के मतदान होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
मतांची टक्केवारी किती?
मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे विदर्भातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.
हे ही वाचा>> Amol Kolhe : 'दादा... मला कोणी गद्दार म्हणत नाही', अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर बारामतीतून वार!
2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.
ADVERTISEMENT