Vidharbha Assembly Elections 2024 Voting live: नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. विदर्भातील एकूण 62 मतदारसंघांमध्ये देखील मतदान घेण्यात येत आहेत. 2019 च्या निवडणुकीत विदर्भाने भाजपला बराच झटका दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. ज्यापैकी अनेक जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना असणार आहे. त्यामुळे आता विदर्भात नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> Vinod Tawade: 'तावडेंना पकडून देण्यासाठी भाजपमध्येच कारस्थान', राऊतांचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला बराच मोठा धक्का बसलेला. त्यामुळे आता महायुतीने विधानसभेसाठी विदर्भात बराच जोर लावला आहे. मात्र त्याआधी विदर्भात मतदानाचा टक्का कसा राहणार यावर देखील बरीच गणित अवलंबून असणार आहे.
मतांची टक्केवारी किती?
मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे विदर्भातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.
हे ही वाचा>> Vinod Tawde Vs Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूरांकडून आधी राडा, नंतर एकाच गाडीतून तावडेंना नेलं जेवायला!
2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.
ADVERTISEMENT