West Maharashtra assembly polls live: प. महाराष्ट्रात कोणाचा बोलबाला, किती टक्के मतदान?

रोहित गोळे

20 Nov 2024 (अपडेटेड: 20 Nov 2024, 07:11 AM)

2024 पश्चिम महाराष्ट्र विधानसभा थेट मतदान|2024 West Maharashtra assembly live voting: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. पाहा पश्चिम महाराष्ट्रात नेमके किती टक्के मतदान झालं आहे.

2024 West Maharashtra live updates on Voting: पश्चिम महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

2024 West Maharashtra live updates on Voting: पश्चिम महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभरात मतदान सुरू

point

पश्चिम महाराष्ट्र विभागात एकूण 58 जांगासाठी मतदान

point

पाहा पश्चिम महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं

West Maharashtra Assembly Polls 2024: पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विशेषत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळत आलं आहे. पण यंदाच्या निवडणुकीत बरीच राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे प. महाराष्ट्रात नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलं का?

पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 58 जागा असून त्यापैकी अनेक जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात पवार विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

हे ही वाचा>> Eknath Shinde Shiv Sena : मतदानाच्या एक दिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा दणका

लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जागी महाविकास आघाडीला भरभरून मतदान झालेलं. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र हा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र त्याआधी पश्चिम महाराष्ट्रात नेमकं किती टक्के मतदान होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

मतांची टक्केवारी किती?

मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे विदर्भातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.

हे ही वाचा>> Sanjay Raut : "भाजपला राज्यात संध्याकाळपर्यंत...", देशमुखांवरील हल्ल्यानंतर राऊतांचा गंभीर आरोप

2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.

    follow whatsapp