Marathwada Assembly election 2024 Poll Voting Percentage: औरंगाबाद: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. अशावेळी मराठवाडा हा विभाग यंदाच्या निवडणुकीत अतिशय निर्णायक असा ठरणार आहे. कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच या भागात मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे आणि त्याभोवतीच ही संपूर्ण निवडणूक फिरत आहे.
ADVERTISEMENT
मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत. ज्यापैकी अनेक जागांवर मराठा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मराठवाड्यात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> Rahul Gandhi: 'मोदीजी ते 5 कोटी टेम्पोत कुणी पाठवले?'; राहुल गांधींनी विनोद तावडेंचा 'तो' व्हिडीओ केला व्हायरल
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून महायुतीला बराच धक्का बसला होता. त्यामुळे आता महायुतीने विधानसभेसाठी कशा प्रकारे कोर्स करेक्शन केलं आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र त्याआधी मराठवाड्यात मतदानाचा टक्का कसा राहणार यावर देखील बरीच गणित अवलंबून असणार आहे.
मतांची टक्केवारी किती?
मतदानाची टक्केवारी ही दर दोन तासांनी निवडणूक आयोगाकडून दिली जाते. त्यानुसार आपल्याला इथे मराठवाड्यातील मतदानाची आकडेवारी पाहता येईल.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray On Vinod Tawde: "तावडेंनी आतापर्यंतची सरकारं कशी पाडली...", उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं
2019 विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळालेल्या?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसला भरघोस यश
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात प्रचंड मोठं यश मिळवलं. तब्बल 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा करताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा भाव हा चांगलाच वधारला होता.
ADVERTISEMENT