Sharad Pawar : 'मोदी देशाचे प्रमुख आहेत पण...', पवारांनी वर्मावरच ठेवलं बोट

Sharad Pawar Criticize PM Narendra Modi : 'पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. शेतमालाच्या किंमती वाढू म्हणून सांगितलं. मात्र प्रत्यक्षात काहीही केलं नाही. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत आणि औषधाच्या किंमती करू म्हणून सांगितलं पण केल्या नाही. आज शेतकरी जे पिकवत आहे त्याला चांगली किंमत मिळत नाही.

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही.

Sharad pawar criticize narendra modi nashik rally lok sabha election 2024 shobha bacchav

प्रशांत गोमाणे

16 May 2024 (अपडेटेड: 16 May 2024, 06:13 PM)

follow google news

Sharad Pawar Criticize PM Narendra Modi : नाशिकच्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लोबोल केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध जाती धर्मात ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढतायत, अशी बोचरी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)  केली आहे. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नसेल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दातही पवारांनी मोदींना डिवचलं आहे. (Sharad pawar criticize narendra modi nashik rally lok sabha election 2024 shobha bacchav)  

हे वाचलं का?

धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ सटाणा येथे सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलते होते. नरेंद्र मोदी देशाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची पहिली जबाबदारी आहे की, देशाचे सर्व घटक, जात, धर्म, भाषा या सगळ्या गोष्टी एकसंघ कशा ठेवता येईल. पण हे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी देशातील विविध जाती धर्मांमध्ये ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवले आहेत, अशी टीका पवारांनी मोदींवर केली.

हे ही वाचा : मुंबईतील मुस्लीम मतदार ठाकरे-गांधींबद्दल काय विचार करतात?

''पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. शेतमालाच्या किंमती वाढू म्हणून सांगितलं. मात्र प्रत्यक्षात काहीही केलं नाही. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत आणि औषधाच्या किंमती करू   म्हणून सांगितलं पण केल्या नाही. आज  शेतकरी जे पिकवत आहे त्याला चांगली किंमत मिळत नाही. त्यामुळे जो तुमच्या मेहनतीला किंमत देत नाही, त्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केली.

    follow whatsapp