Shiv Sena UBT: शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे परतणार? संजय राऊतांचं मोठं विधान...

मुंबई तक

• 11:48 AM • 08 Jun 2024

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार हे पुन्हा ठाकरेंकडे पतरणार का? यावर संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे.

संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊतांचं मोठं विधान

follow google news

Sanjay Raut on Shiv Sena MLA: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एका मोठ्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. ज्यावर आता ठाकरेंचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. (shiv sena ubt will eknath shinde mla return to thackeray sanjay raut big statement)

हे वाचलं का?

'जे पळून गेले, जे बेईमान आहेत.. त्यातील काही लोकं असे आहेत की त्यांच्या मनात चल-बिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश.. त्यांच्या मनातील तरंग जे उठतायेत आता ते आमच्यापर्यंत पोहचतायेत.. त्या तरंगाचं काय करायचं ते बघू आम्ही..' असं संजय राऊत यावेळी म्हणाले. याआधी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना शिवसेनेत परत घेणार नाही असं संजय राऊत वारंवार म्हणत होते. मात्र, आता त्यांचा सूर बदलला आहे.

संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 'संविधानाला नमस्कार करणं हे नाटक आहे.. ढोंग आहे.. लोकांनी त्यांना झिडकारलं.. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधानाची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो.'

हे ही वाचा>>Uddhav Thackeray : शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भूकंप होणार?

'हे सरकार खरोखर टिकणार नाही.. भूपेश बघेल हे आता बोलतायेत हे मी निकाल लागल्यापासून बोलतोय. हे सरकार टिकणार नाही.. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे, अमित शाहांनाही माहितीए. त्यांचे चेहरे बघा.. त्यांचा चेहराच सांगतोय.. म्हणून जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा.. आपल्या बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा. लाखो, शेकडो कोटींचा या देशाला चुना लावायचा.. हे यांचं धोरण दिसतंय.'

हे ही वाचा>> NCP : अजित पवारांच्या बैठकीला 5 आमदारांची दांडी, राजकीय भूकंप होणार?

'महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. किमान सात ते आठ जागा जोर-जबरदस्ती, पैशाचा वापर, लबाडी अशा पद्धतीने त्यांनी निवडून आणल्या.. नाहीतर महायुती जो काही आहे त्यांना 10 जागा पण मिळाल्या नसत्या.. विधानसभेला याचा वचपा काढला जाईल या चोऱ्या-माऱ्यांचा हे आता कळून आलंय की, आपण पुन्हा निवडून येत नाही.' अशा शब्दात संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली. 

    follow whatsapp