BJP Minister Suresh Gopi: नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या 72 मंत्र्यांपैकी एक म्हणजे केरळचे भाजप खासदार सुरेश गोपी. केरळमधील ते भाजपचे पहिले खासदार आहेत. दरम्यान, शपथ घेणारे सुरेश गोपी हे मात्र, कालच मिळालेलं मंत्रिपद सोडू शकतात, अशी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सुरेश गोपी म्हणाले की, मी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती, मला आशा आहे की, लवकरच मला या पदावरून मुक्त केले जाईल.' असं ते म्हणाले. (suresh gopi the only bjp mp from kerala took oath yesterday and now wants to leave the ministerial post know why)
ADVERTISEMENT
सुरेश गोपी यांनी मंत्रिपद सोडण्यामागे चित्रपट साइन करण्याचे कारण सांगितले आहे. 'मी बरेच चित्रपट साइन केले आहेत आणि ते मला करायचे आहेत. पण मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करत राहीन. सुरेश गोपी यांनी त्रिशूरचा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपले नाव नोंदवले.
हे ही वाचा>> Modi Cabinet Portfolios: देशाचे नवे कृषी आणि आरोग्य मंत्री कोण? सगळी यादी जशीच्या तशी
पहिले होते राज्यसभेचे खासदार
केरळच्या त्रिशूर मतदारसंघातून सुरेश गोपी विजयी. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. सुरेश गोपी लोकसभेचे खासदार होण्यापूर्वी राज्यसभेचे खासदारही होते. ते 2016 मध्ये राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांचा कार्यकाळ 2022 पर्यंत होता.
हे ही वाचा>> अखेर घोषणा! महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती, शिवसेनेला कोणते खाते?
कोण आहेत सुरेश गोपी?
सुरेश गोपी यांचा जन्म 1958 मध्ये झाला. ते मूळचे केरळमधील अलाप्पुझा येथील आहे. त्यांनी कोल्लममधून विज्ञान विषयात पदवी घेतली आणि इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. सुरेश हे पेशाने अभिनेता आहेत. लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. 1998 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
ADVERTISEMENT