Don Arun Gawali : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी (5 मार्च) दिले आहेत. नागपूर खंडपीठाने अरूण गवळीच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी उर्फ डॅडीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. (The Nagpur bench of Bombay High court on Friday in its order directed premature release of underworld Don Arun Gawali)
ADVERTISEMENT
अरुण गवळी यांनी 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे शिक्षेतून सूट मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुंड अरुण गवळीच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली, मात्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज निकाल देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, जेल प्रशासनालाही यासंदर्भात उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
याप्रकरणी आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला 2006 मध्ये अटक करण्यात आली, खटला चालवला गेला, दोषी आढळले आणि 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
2006 सालचा शासन निर्णय आहे तरी काय?
10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार, 65 वर्ष पूर्ण झालेल्या शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना पुढील शिक्षेत सूट देऊन कारागृहातून सुटका करण्याची तरतूद आहे. अरूण गवळी उर्फ डॅडीने या शासन निर्णयाआधारे मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहितीनुसार, जन्मठेपेची शिक्षा चौदा वर्ष पूर्ण केलेल्या कैद्यांना तसंच जर त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सोडता येते अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे गवळी 2007 पासून 16 वर्ष तुरूंगात आहेत आणि त्यांचे वयही 69 वर्ष आहे. अशास्थितीत त्यांची सुटका होण्याची शक्यता जास्त आहे.
ADVERTISEMENT