TV9 Polstrat Exit Poll : महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरणार, शिंदे- अजित पवारांचं काय?

प्रशांत गोमाणे

01 Jun 2024 (अपडेटेड: 01 Jun 2024, 09:14 PM)

TV9 Polstrat Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024 : टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात.

टीव्ही 9 पोसस्ट्रार्टचा एक्झिट पोल हा समोर आला आहे.

tv9 polstrat exit poll result for maharashtra lok sabha election 2024 bjp shiv sena shinde ncp ajit pawar mahayuti congress shiv sena ubt ncp sharad pawar seats in opinion poll result

follow google news

TV9 Polstrat Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चं अखेर आज (1 जून) सूप वाजलं आहे. कारण की, मतदानाचा शेवटचा टप्पा आणि सातवा टप्पा आज पार पडला आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे हे समोर येऊ लागले आहेत. नुकतंच टीव्ही 9 पोसस्ट्रार्टचा एक्झिट पोल हा समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरताना दिसतोय. भापजच्या वाट्याला 18 जागा येताना दिसताय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत. हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

Maharashtra Exit Poll Result 2024 Live: टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोल जसाच्या तसा.. 

टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात. 

हे ही वाचा : ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!

भाजप - 18
शिवसेना (शिंदे गट)- 04
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 00

असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 

दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला राज्यात एकूण 25  जागा मिळू शकतात. हा आकडा इंडिया आघाडीसाठी नक्कीच दिलासादायक ठरू शकतो. 

काँग्रेस - 05  
शिवसेना (ठाकरे गट)- 14
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06

याशिवाय 1 जागा ही अपक्षाला मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Exit Poll Result 2024 Live : महाराष्ट्रात मविआसाठी खुशखबर, NDA ला मोठा फटका

जर या एक्झिट पोलचा आपण विचार केल्यास महाराष्ट्रात टीव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपला 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या नंबरवर ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळताना एक्झिट पोलमध्ये दिसतायत. तर काँग्रेसला 5  जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4  जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या गटाला एकही जागा मिळाली नसल्याचे पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता एक्झिट पोलचे नेमके आकडे कितपत खरे ठरतात हे आपल्या निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला समजणार आहे. 

    follow whatsapp