Shiv Sena UBT: 'गद्दारीचे सूत्रधार मोदी-शाह..', उद्धव ठाकरे जाहीर सभेत प्रचंड संतापले!

Uddhav Thackeray Crirticize Eknath shinde : ज्या सेनेने तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत नेलं त्यांना तुम्ही नकली शिवसेना म्हणता, ते बेकली आहेत, अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली. तसेच आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले म्हणतायत, बाळासाहेब हे काय तुमच्या वर्गात होते का? पहिलं मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, असे ठाकरे यांनी म्हटले.

 तुमच्या वडिलांची नावं सांगितलं तर कोण तुम्हाला दारातही उभं करणार नाही.

uddhav thackeray criticize eknath shinde pm narendra modi pune rally lok sabha election 2024

मुंबई तक

08 May 2024 (अपडेटेड: 08 May 2024, 10:19 PM)

follow google news

Uddhav Thackeray Crirticize Eknath shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. शिंदेंच्या या विधानाचा समाचार आता उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मी मिधेंना धन्यवाद देतो, त्यांनी कोर्टाच्या आधी गद्दारीचे सुत्रधार मोदी आणि शाहा असल्याची जाहीर कबूली दिली, अशी टीका ठाकरेंनी केली. (uddhav thackeray criticize eknath shinde pm narendra modi pune rally lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे पुण्यातील सभेत बोलत होते. या सभेतून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी माकड आहेत, यांच्या हातात कोलीत सापडलंय. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? आता त्या दोन माकडांना सांगतो, बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. माझे वडील चोरून तुम्ही मत मागता, तुमच्या वडिलांची नावं सांगितलं तर कोण तुम्हाला दारातही उभं करणार नाही, असा टोला ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. 

हे ही वाचा : 'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात हा..', राहुल गांधींचा मोदींना सवाल!

ज्या सेनेने तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत नेलं त्यांना तुम्ही नकली शिवसेना म्हणता, ते बेकली आहेत, अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली. तसेच आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले म्हणतायत, बाळासाहेब हे काय तुमच्या वर्गात होते का? पहिलं मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, असे ठाकरे यांनी म्हटले.

कोणाता किती मुलं व्हावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपला राजकारणात मुलं होत नाहीत त्यात आमचा काय दोष आहे. म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागताय. मुलं चोरली तर चोरली वडील पण चोरताय, मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला मग ही अशी अनौरस माणस म्हणून यांनी मी भेकड म्हणतो, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली.

हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी आणि अंबानी विरोधात बोलत आहेत. सूर्य पश्चिमेकडे उगवला आहे का? हा जगातला मोठा चमत्कार अशी खिल्ली ठाकरेंनी उडवली. धारावीची जमीन तुमच्या चेल्यांनी अदानीच्या घशात घातली. आता त्यांना काँन्ट्रॅक्ट रद्द करायला लावा मग अडाणींवर बोला, असे ठाकरे म्हणालेत. 
 

    follow whatsapp