Uddhav thackeray criticize Narendra modi Amit shah : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहु महाराज निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. छत्रपती शाहु महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात शिवशाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून बोलताना शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आता दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. (uddhav thackeray criticize narendra modi amit shah kolhapur lok sabha election 2024 chhatrapati shahu maharaj)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत. महाराष्ट्राचा आकस महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला,मोरारजी देसाई यांनी मराठा देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होता. आताही सुरतचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत. पण या लुटारूंचा सुपडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : मोदीजी.. महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला दाखवल्याशिवाय..: पवार
यांना (मोदी) महाराष्ट्रातले शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडायचे आहेत.म्हणजे महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. सध्या मोदी सरकारचा गजनी सरकार झाला आहे. 2014 साली काय बोलले 2019 साली आठवत नाही.2019 ला काय बोलले हे 2024 ला आठवत नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला.
सत्तेत आल्यानंतर शेती अवजारे यांच्यावरील जीएसटी माफ करणार आहोत. जे शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाहीत त्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा निर्धार करण्याचे आवाहन यावेळी ठाकरेंनी केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे मानायला तयार नाही. दलित व्यक्तीने लिहिलेलं संविधान मी कसं मानू हा आकस त्यांना आहे. मोदींची तुमच्या गुजरातमध्ये भटकता आत्मा शोधा, महाराष्ट्रात शोधू नका. भवानी मातेबद्दलचा आकस मला धाराशिवमध्ये पाहायला मिळाला हा आकस गाडून टाकायचा आहे, आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, कोरोना काळात सांगत होतो या व्हायरसपासून दूर रहा, आज सांगतो भाजपच्या व्हायरसपासून दूर रहा असे आवाहन त्यांनी केले.
ADVERTISEMENT