Uddhav Thackeray on PM Modi : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मोदींनी विजयाची हॅटट्रिक केली असली, तरी त्यांच्या मताधिक्याची चर्चा जास्त होत आहे. याच मुद्द्यावरून जेव्हा ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ठाकरेंना हसू अनावर झाले. त्याला उत्तर देताना ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली. (Uddhav Thackeray Reaction on PM Modi’s victory margin)
ADVERTISEMENT
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या वचननामा आज (12 जून) उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे परत निघाले तेव्हा त्यांना पंतप्रधान मोदींच्या मताधिक्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांना हसू अनावर झाले.
मोदींबद्दल प्रश्न ऐकून ठाकरे का हसले?
झालं असं की ठाकरे वचननामा जाहीर केल्यानंतर परत निघाले. त्याचवेळी 'मोदींचे मताधिक्य जे घटलेले आहे, त्यावर भाजप नेते असे म्हणताहेत की,जग हळहळले. मोदींना जागा कमी आल्या त्यामुळे जग हळहळले', असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला.
हेही वाचा >> शरद पवारांचा खासदार अजित पवारांसोबत जाणार, सत्य काय?
हा प्रश्न ऐकताच माघारी निघालेले ठाकरे हसतच येऊन खुर्चीवर बसले. त्यानंतर त्यांनी मोदींबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिले.
उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली?
ठाकरे म्हणाले, "आता तुम्ही नेहमी सांगता तसे झालेले आहे. जग हळहळले कारण एवढे तरी मताधिक्य का मिळालं?", असे उत्तर देत ठाकरे हसतच पत्रकार परिषदेतून निघून गेले.
Lok Sabha 2024 : मोदींना नेमकं किती मताधिक्य मिळालं?
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढत होते. पंतप्रधान मोदी यांना 6 लाख 12 हजार 970 इतकी, तर अजय राय यांना 4 लाख 60 हजार 457 इतकी मते मिळाली. मोदी यांनी राय यांचा 1 लाख 52 हजार 513 इतक्या मताधिक्याने पराभव केला.
मोदींना 2014 आणि 2019 मध्ये किती होते मताधिक्य?
नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना किती मताधिक्य होते, हे पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा >> "....तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते"
लोकसभा 2019 च्या निवडणुकीत मोदींच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव उमेदवार होत्या. त्यांचा मोदींनी 6 लाख 74 हजार 664 इतके मताधिक्य घेत पराभव केला होता. मोदींना 2019 मध्ये 63.62 टक्के मते मिळाली होती.
लोकसभा 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती. मोदींनी त्यांचा तब्बल 3 लाख 71 हजार 784 इतके मताधिक्य घेत पराभव केला होता. मोदींना त्यावेळी 56.4 टक्के मते मिळाली होती.
ADVERTISEMENT