Udhhav Thackeray Reply Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदींच्या या टीकेवर आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. नकली सेना बोलल्यावर मी सोडतोय काय? तुम्ही कोण आम्हाला सर्टीफिकेट देणारे? असा सवाल करत, तुम्ही शिवसेनेला नकली शिवसेना पक्ष म्हणता, पण तुमचा भाजप पक्ष भाकड आणि भेकड जनता पक्ष झालाय, असे प्रत्युत्तर ठाकरेंनी (Udhhav Thackeray) पंतप्रधान मोदींना (Pm Narendra Modi) दिले आहे. (udhhav thackeray reply pm narendra modi on duplicate shiv sena salapur lok sabha election 2024 praniti shinde ram satpute)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. ''कमळा''बाईचे एक नेते सोलापूरला येऊन गेले. नकली सेना बोल्यावर मी सोडतोय काय? 48 पैकी 42 खासदार निवडून देणे म्हणजे गंमत आहे का? तेव्हा शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तख्तावर बसलात. आता शिवसेना तुमच्यासोबत नाही, तुम्ही त्या तख्तापर्यंत पोहोचू शकत नाही आणि पोहोचू देणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.
हे ही वाचा : अजित पवारांच्या भावाचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच..'
तुम्ही कोण आम्हाला सर्टीफिकेट देणारे? जेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला, तेव्हा तुम्ही हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल, अशी खिल्ली ठाकरेंनी मोदींची उडवली. तसेच अटलजी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला चालले होते. तेव्हा शिवसेना प्रमुख नसते तर मोदीजी सत्तेत जी 10 वर्ष तुम्ही भोगली ती भोगायला देखील मिळाली नसती, अशी टीका देखील ठाकरेंनी मोदींवर केली.
अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल. कोणाकडे आज भारतीय जनता पार्टी गेली म्हणत.लोकांच्या मनात हीच भिती आहे, तुम्ही संविधान बदलणार आहात. महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात. भाजपात हिंमत असेल तर ज्या घटनेवर तुम्ही हात ठेवून शपथ घेतलात. घटनेवरती हात ठेवून पाहा संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही.यांना घटना का बदलायची आहे? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकस आहे, असी टीका देखील ठाकरेंनी मोदींवर केली.
हे ही वाचा : 'ब्लेम गेम कशाला खेळता?', उदयनराजे भडकले..
टरबूजाच काय करायचं तुम्हाला माहितीय.पण टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येतं, पण हा तर दुष्काळात तेरावा महिना आहे, अशा शब्दात ठाकरेंनी मोदींना टोला लगावला.तसेच हे टरबूज नाहीच आहेत, हे आहेत चिराट, म्हणजे आले तेव्हा टरबूज होते आता पाव उप मु्ख्यमंत्री झाले आहेत म्हणजे झाले की नाही चिराट, अशी खिल्ली देखील ठाकरेंनी फडणवीसांची उडवली.
ADVERTISEMENT