Ujjawal Nikam Vs Vijay Waddetiwar, Sm Mushrif : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपने जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay waddetiwar) यांनी 'हू किल्ड करकरे' (Who Killed Karkare) या एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हेमंत करकरेंवर एका पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली होती. हा अधिकारी आरएसएस समर्पित होता. या अधिकाऱ्याचे पुरावे उज्ज्वल निकम यांनी लपवल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आता 'हू किल्ड करकरे' या पुस्तकाचे लेखक एस. एम. मुश्रीफ (sm mushrif) यांनी यावर भाष्य केले आहे. (ujjwal nikam allegation vijay waddetiwar who killed karkare book writer sm mushrif big allegation)
ADVERTISEMENT
एस. एम. मुश्रीफ यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली आहे. यामध्ये मुश्रीफ यांनी अनेक गोष्टीचा खुलासा केला आहे. भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने मला वाटलं या प्रकरणात आपण काहितरी निवेदन दिले पाहिजे. कारण ते या प्रकरणात सरकारी वकील होते. त्यामुळे सत्य लोकांसमोर आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. पण ते मी या पुस्तकाच्या माध्यमातून आणलं होतं, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
हे ही वाचा : ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव
मुश्रीफ पुढे म्हणाले, हेमंत करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या होत्या, त्याची फॉरेन्सिक टीमने तपासणी केली होती. या तापसणीत असं आढळलं की, हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून झाडल्या गेल्या नव्हत्या किंवा त्याचा साथीदार इस्माईल त्याच्याही रायफलमधून झाडल्या गेल्या नव्हत्या, असा स्पष्ट रिपोर्ट समोर आला होता.कोर्टाच्या निकालात स्पष्ट लिहलंय, हेमंत करकरेंच्या शरीरातल्या गोळ्या या अजमल कसाब आणि इस्माईलच्या रिवॉलव्हरमधून झाडल्या नव्हत्या.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय. मानेपासून खाली पोटापर्यंत त्यांना पाच गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. यामधल्या तीन गोळ्या बाहेर निघाल्या आणि दोन पोटात अडकून राहिल्या होत्या, म्हणून त्यांचा मृत्यू झाला होता, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
हे ही वाचा : 'आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाकरेंनी त्यांची प्रॉपर्टी विचारली'
दरम्यान या प्रकरणात हेमंत करकरेंचा ज्या गोळ्यांमुळे मृ्त्यू झाला होता. त्या गोळ्या त्यांना कोणी मारल्या होत्या. याबाबत तपास करण्याचा आदेश द्या, अशी कोर्टाला विनंती करण्याची उज्ज्वल निकमांची जबाबदारी होती. पण त्यांनी तशी विनंती कोर्टाला न करता ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणली नाही. याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता,असा आरोप मुश्रीफांनी केला.
प्रभाकर आलोक आणि ज्यांनी मानेवरून खाली गोळ्या झाडल्या ते एक पोलीस अधिकारी हे दोन्हीही आरएसएसशी संबंधित आहेत, अशी माहिती मिळाली. याचा अर्थ उज्ज्वल निकमांनी आरएसएसशी संंबंधित या हल्ल्यास जबाबदार असलेल्या महत्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तीला वाचवलं,असा आरोप मुश्रीफांनी केला. तसेच आता प्रभाकर आलोक, संजय गोईरकर आणि उज्ज्वल निकम या तिघांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.
ADVERTISEMENT