Pune Lok Sabha election 2024 : 'वंचित' वसंत मोरेंना पुण्यातून देणार लोकसभेची उमेदवारी?

ऋत्विक भालेकर

29 Mar 2024 (अपडेटेड: 29 Mar 2024, 12:57 PM)

Vasant More Prakash Ambedkar Meeting : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवणार असून, प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे यांना उमेदवारी देेणार?

point

प्रकाश आंबेडकर-वसंत मोरेंमध्ये झाली चर्चा

point

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित देणार उमेदवार

Vasant More Prakash Ambedkar Pune Lok Sabha : महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केल्यामुळे वसंत मोरे काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात मोरे यांची वंचित बहुजन आघाडीसोबत जवळीक वाढली आहे. त्यामुळे मोरे यांना वंचित बहुजन आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवणार, असेच संकेत मिळत आहे. मोरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंबेडकरांनीही असेच संकेत दिले. (Vasant More is likely to contest from vanchit bahujan aghadi from pune lok sabha constituency)

हे वाचलं का?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची वसंत मोरे यांनी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली.

वसंत मोरे आंबेडकरांच्या भेटीबद्दल काय बोलले? 

बैठकीनंतर वसंत मोरे म्हणाले, "पुणे लोकसभेची निवडणूक शंभर टक्के लढणार आहे. मला प्रकाश आंबेडकरांनी बोलावलं आणि मला वेळ दिला. आमची चर्चा झाली आहे. आणखी चर्चा व्हायची आहे. पुण्याची चौथ्या टप्प्यात निवडणूक आहे. खूप लांब आहे. सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढचे मार्गक्रमण कसे असेल, हे पुढील दोन-तीन दिवसांत कळेल. सकारात्मक चर्चा झाली आहे."

हेही वाचा >> 'या' एका जागेमुळे ठाकरे-शिंदेंची वाढली कटकट!

"मी पुण्यातील वंचितचा उमेदवार असेल का, हे प्रकाश आंबेडकर जाहीर करतील. दोन दिवसांत या बाबती दोन-तीन दिवसांत निर्णय होईल", असे वसंत मोरे बैठकीनंतर बोलले.

प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका 

मोरे यांच्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "तात्यांबरोबर चर्चा झालेली आहे. दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृत सांगायचं आहे किंवा कळवायचं आहे. ते ३१ तारखेला सांगेन. महाराष्ट्रातील नव्या राजकारणाची सुरूवात कशी होईल आणि कोण करेल हे सगळं मांडलं जाईल."

हेही वाचा >> 'या' मतदारसंघांमध्ये ठाकरे-शिंदे थेट भिडणार, पाहा नेमकी यादी 

"काही चर्चा मी आता सांगू शकत नाही. घटना अजून घडत आहेत. राजकीय स्तरावर नाही, पण सामाजिक स्तरावर घडत आहे. त्याला आकार येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील समीकरण समोर येईल. आजची चर्चा त्यातीलच एक भाग होता", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी देण्याबद्दलच्या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, "मी म्हणालो की, दोन दिवसांत जे काही ग्रामीण शहरी पातळीवर होतंय त्याबद्दल आज बोलू इच्छित नाही. नंतर बोलेन आणि त्यात सगळी उत्तरे असतील. चार दिवसांचा वेळ द्या. त्यानंतर मी सांगेन."

2019 मध्ये वंचितने कुणाला दिली होती उमेदवारी?

वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्येही पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला होता. ज्या अनिल जाधव यांची वसंत मोरेंनी भेट घेतली, त्यांनाच वंचित तिकीट दिले होते. या निवडणुकीत अनिल जाधव यांना ६४ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे सहा लाखांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले होते, तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना तीन लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती.

    follow whatsapp