Madha lok sabha : मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव?

मुंबई तक

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 12:30 PM)

Madha Lok Sabha Result analysis : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने फडणवीसांनी ताकद लावली होती. पण, तरीही भाजपला पराभव स्वीकारावा लागला.

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.

माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी ६ लाख मतांनी विजय मिळवला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४

point

भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव

point

धैर्यशील मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय

Madha Lok Sabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकण्यात भाजपला २०१९ मध्ये यश आले होते. पण, विजयसिंह मोहिते पाटलांनी साथ सोडताच माढा भाजपच्या हातून निसटला. पंतप्रधान मोदींनी सभा घेऊनही भाजपचा पराभव का झाला? भाजपच्या पराभवासाठी कोणते फॅक्टर जबाबदार ठरले, हेच सगळं समजून घेण्यासाठी पहा व्हिडीओ... (Why Did BJP Lost Madha Lok Sabha Seat)

हे वाचलं का?

माढा लोकसभेचा निकाल कोणत्या फॅक्टरने ठरवला... पाहा Video

माढा लोकसभा निवडणूक निकाल 

2019 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. पक्षातून आणि मित्रपक्षातून विरोध असतानाही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली.

हेही वाचा >> "मोदींसोबत मैत्रीपेक्षा शत्रुत्व फायद्याचे, कारण...", ठाकरेंचे वर्मावर बाण 

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यांची नाराजी हेरत शरद पवारांनी संधी साधली आणि मोहिते पाटलांना राष्ट्रवादी आणत रिंगणात उतरवले. त्यानंतर फडणवीस यांनी बरीच राजकीय गणित जुळवून आणली. पण, त्याचा फायदा झाला नाही.

हेही वाचा >> भाजपचे बालेकिल्ले ढासळले! मराठवाड्यात प्रचंड हादरे 

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे तब्बल ६ लाख २२ हजार २१३ मते घेऊन विजयी झाले. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ५ लाख १ हजार ३७६ मते मिळाली. 

 

    follow whatsapp