Lok Sabha Election 2024 Seats Sharing : भाजप, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर एकमत झाले आहे. आंध्र प्रदेशात भाजप 6 जागांवर, टीडीपी 17 जागांवर तर जनसेना 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलीये. निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दुसरीकडे दक्षिणेत आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजप प्रादेशिक पक्षांशी चर्चा करत आहे.
दक्षिणेत प्रादेशिक पक्षांसोबत घरोबा
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय भाजप, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या सूत्रावर एकमत झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये TDP लोकसभेच्या 17 जागांवर, भाजप 6 जागांवर आणि पवन कल्याणचा पक्ष जनसेना 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
हेही वाचा >> अजित पवारांचा विश्वासू शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, कोण आहेत निलेश लंके?
विधानसभा निवडणुकीसाठीही युती
लोकसभा निवडणुकीशिवाय विधानसभा निवडणुकीसाठीही तिन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे. विधानसभा निवडणुकीत टीडीपी 144, भाजप 10 आणि जनसेना 21 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
टीडीपीचे जनतेला आवाहन
जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत माहिती देताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आज अमरावतीमध्ये भाजप, टीडीपी आणि जेएसपीने जागावाटपाचा चांगला फॉर्म्युला तयार केला आहे. मी माझ्या आंध्र प्रदेशातील लोकांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी या युतीला आशीर्वाद द्यावा आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला ऐतिहासिक जनादेश द्यावा."
हेही वाचा >> बारामतीत पवारांना कोणी दिला नकार?, बालेकिल्ल्यातील एक जबरदस्त Inside Story
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 17 मार्च रोजी गुंटूर जिल्ह्यात टीडीपी चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत मोठी संयुक्त रॅली काढू शकतात. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
टीडीपी आणि भाजपचा घरोबा जुनाच
भाजप आणि टीडीपीचे राजकीय नाते खूप जुने आहे. दोन्ही पक्षांची पहिली युती 1996 साली झाली होती. त्यानंतर टीडीपी एनडीएमध्ये सामील झाला होता. या दोन्ही पक्षांनी 2014 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या, तर 2014 च्या निवडणुकीत जेएसपीने भाजपला पाठिंबा दिला होता, पण 2014 नंतर दोन्ही पक्षांत मतभेद झाले आणि टीडीपी एनडीएपासून वेगळा झाला. दोन्ही पक्षांनी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या होत्या, जिथे YRS काँग्रेसने TDP चा दारूण पराभव केला होता.
ADVERTISEMENT