बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर येथे ‘महासभा एकनिष्ठेची, भव्य शेतकरी मेळावा’, महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणाले, "शरद पवार हे राजकारणातले पितामह आहे. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो पळकुट्यांचा नाही..! आपण नक्कीच कर्जमाफी करू, पण गद्दारांना माफी करणार नाही..! पवार साहेबांनी व्यासपीठावरून मला दाखवले, पहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. सूर्य मावळल्यानंतर या प्रकाशात टोप्या अजून उजळून निघाल्या. स्वच्छ चकचकीत या टोप्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेल्या नाहीत. या ओरिजनल, प्रामाणिक आणि मुख्यतः बदलणाऱ्या टोप्या नाहीयेत. मिशन ४५ अशी घोषणा अमित शहांनी केली. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात, अब की बार ४०० पार; त्यावर आम्ही घोषणा करू, आपकी बार भाजपा तडीपार... नरेंद्र मोदींना एक स्पेशल भारतरत्न द्यायचा आहे. जलदगतीनं फेकाफेकी करणारा माणूस जगात जन्माला आला नाही तर भारतात भाजपमध्ये जन्माला आला", असे राऊत म्हणाले.
"हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला. मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय ? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्यांनी शिकवलं आहे. कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे हे त्यांनी शिकवलं. वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला आहे. त्यामुळे, तो अध्यक्ष आहे. ही लढाई बारामतीची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि पवार साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत", असे राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT