Baramati Lok Sabha  2024 : अजित पवारांना बारामती जाणार जड! कसे बदलले गणित?

भागवत हिरेकर

12 Mar 2024 (अपडेटेड: 12 Mar 2024, 11:40 AM)

Ajit Pawar News Baramati Lok sabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवार देणार आहेत, पण मित्रपक्षातील नेतेच त्यांच्याविरोधात मोर्चा उघडू लागले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांसमोर मित्रपक्षातील नेत्यांचेच आव्हान.

अजित पवार यांच्याविरोधात विरोधक एकवटताना दिसत आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघात बदलले राजकारण

point

महायुतीतील मित्रपक्षांचे नेते अजित पवारांविरोधात.

point

शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी मैदानात

Ajit Pawar Sunetra Pawar Baramati Lok Sabha 2024 : "पुढचा विचार माझ्या विचारांचाच निवडून आला पाहिजे", असे सांगत अजित पवारांनी बारामतीत जोरात काम सुरू केलं आहे. पण, महायुतीचे जागावाटप होण्याआधीच अजित पवारांना घेरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना जिंकून आणण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे, तर दुसरीकडे अजित पवारांचे विरोधक आता बदला घेण्याची भाषा करू लागले आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय गणिते कशी बदलत आहे, हेच जाणून घ्या...

हे वाचलं का?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांनी पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी सुरू केलेली असताना मित्रपक्षातील त्यांच्या विरोधकांनी टेन्शन वाढवलं आहे. 

बारामतीत अजित पवारांसमोर काय आव्हाने?

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि बारामती असे ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. बारामतीचे आमदार स्वतः अजित पवारच आहेत. पण, शरद पवारांचं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे. 

हेही वाचा >> शिंदे-पवार सोबत तरीही भाजपचं मिशन 45 धोक्यात! मविआचं काय?

आता दौंडबद्दल बोलायचं तर इथे राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरातांचा पराभव करून ते आमदार बनले. थोरात हे अजित पवारांसोबत आहेत. खडकवाला येथे भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. त्यांनीही राष्ट्रवादीच्याच सचिन दोडके यांना पराभूत केलेले आहे. पण, दोडके शरद पवारांसोबत आहेत. 

लोकसभा जिंकण्यासाठी इंदापूर महत्त्वाचे

इंदापूरचे आमदार दत्ता भरणे आहेत. ते अजित पवारांसोबत आहेत. पण, इथे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय वैर आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे आता भाजपत आहे. पण, त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आम्हाला विधानसभेला मदत करणार असतील, तर आम्ही त्यांचे काम करू. त्यामुळे अजित पवारांना इथे मित्रपक्षातील नेत्यांकडूनच साथ मिळताना दिसत नाहीये.

हेही वाचा >> Citizenship Amendement Act : CAA चा महाराष्ट्रात काय परिणाम होणार?

पाटलांसोबत वैर असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. शिवसेनेत असलेले शिवतारे महायुतीत असूनही त्यांना साथ देताना दिसत नाहीये. त्यामुळे इथली किती मते मिळणार हेही मते महत्त्वाची असणार आहे. 

भोरमध्ये शरद पवारांची खेळी

आता भोर विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर येथील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी शरद पवारांनी जूळवून घेतले आहे. शरद पवार आणि थोपटे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पण, पवारांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि बेरजेचं राजकारण घडवून आणलं. संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचे जाहीरसभेत सांगितले. 

अजित पवारांना मित्रपक्षातील नेत्यांची साथ मिळणार का?

सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार असणार आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या नेत्याकडून त्यांना साथ मिळणे अपेक्षित आहे. पण, अजित पवारांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकांचा आता मित्रपक्षातील नेते उच्चार करताना दिसत आहे. हर्षवर्धन पाटलांना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून सुरू आहेत, तर दुसरीकडे शिवतारेंनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे बारामती जिंकणे अजित पवारांना जड जाऊ शकते, अशीच स्थिती सध्या दिसत आहे. 

    follow whatsapp