Aishwarya Abhishek Divorce Rumour : ''...म्हणून अभिषेक सोबतचा चित्रपट नाकारला'', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

• 08:52 PM • 25 Aug 2024

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : ऐश्वर्या राय एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करायची. पण लग्नानंतर ऐश्वर्या फार कमी सिनेमांमध्ये झळकली होती. या दरम्यान तिने अनेक सिनेमांना नकार दिला होता. यामध्ये 'कुछ कुछ होता है', 'मुन्ना भाई MBBS' आणि 'भूल भुलैया' यांसारख्या सिनेमा होते. तसेच फार कमी लोकांना एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे अभिनेता शाहरुख खान स्टारर 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाबाबत देखील ऐश्वर्या हिला विचारण्यात आलं होतं.

because of abhishek bachchan aishwarya rai bachchan reject shahrukh khan happy new year movie on interview aishwarya abhishek divorce bachchan rumour

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मुलाखतीत ऐश्वर्याचा मोठा खुलासा

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेकमुळे ऐश्वर्याने तो सिनेमा नाकारला

point

कारण सिनेमात ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी नव्हती

point

एका मुलाखतीत ऐश्वर्याचा मोठा खुलासा

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या चर्चा सूरू असताना अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओला घटस्फोटाच्या चर्चेशी जोडले जात आहेत. त्यात आता ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai) मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत सिनेमात अभिषेक (Abhishek Bachchan) असल्या कारणाने चित्रपट नाकारल्याचे ती सांगताना दिसते आहे. (because of abhishek bachchan aishwarya rai bachchan reject shahrukh khan happy new year movie on interview aishwarya abhishek divorce bachchan rumour) 

हे वाचलं का?

ऐश्वर्या राय एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करायची. पण लग्नानंतर ऐश्वर्या फार कमी सिनेमांमध्ये झळकली होती. या दरम्यान तिने अनेक सिनेमांना नकार दिला होता. यामध्ये 'कुछ कुछ होता है', 'मुन्ना भाई MBBS' आणि 'भूल भुलैया' यांसारख्या सिनेमा होते.  तसेच  फार कमी लोकांना एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे अभिनेता शाहरुख खान स्टारर 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाबाबत देखील ऐश्वर्या हिला विचारण्यात आलं होतं. पण सिनेमात पती अभिषेक बच्चन असल्यामुळे अभिनेत्री सिनेमा करण्यास नकार दिला होता.

हे ही वाचा : Cm Vayoshri Yojana : 'लाडक्या बहिणी'नंतर कुणाला मिळणार 3000 रूपये?

एका मुलाखतीत ऐश्वर्याने याबाबत मोठा खुलासा केला होता. 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण और अभिषेक बच्चन यांच्यसोबत, विवान शाह, सोनू सूद आणि बोमन ईराणी देखील होते.

'हो…मला 'हॅप्पी न्यूअर' सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं. सिनेमासाठी मी होकार दिला असता तर, एक आठवण कायमची मनात राहिली असती. पण सिनेमा माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी नव्हता. कारण सिनेमात आमची जोडी नव्हती… सिनेमात माझी आणि शाहरुखची जोडी होती. त्यामुळे माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे सिनेमात काम करण्यास मी नकार दिला' असं ऐश्वर्या राय म्हणाली होती.

ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या  अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक अराध्या हिला जन्म दिला होता.

    follow whatsapp