Hardik Pandya : पांड्या खरंच 'त्या' ब्रिटीश सिंगरला करतोय डेट? मोठा पुरावा सापडला

मुंबई तक

17 Aug 2024 (अपडेटेड: 17 Aug 2024, 09:01 PM)

Hardik Pandya Jasmin Walia Dating : हार्दिक पांड्याचे नाव एका ब्रिटिश सिंगर सोबत जोडलं जातंय. जास्मिन वालिया (Jasmin Walia) असे या सिंगरचे नाव आहे. दोघेही डेट करत असल्याची चर्चा आहे. असे असताना आता दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा मोठा पुरावा सापडला आहे. नेमका हा पुरावा काय आहे? हे जाणून घेऊयात.

hardik pandya jasmil walia dating photo viral divorce from natasha stankovic netizens got proof

हार्दिक जास्मिन वालियाला डेट करतोय

follow google news

बातम्या हायलाइट

point

हार्दिक जास्मिन वालियाला डेट करतोय

point

फोटोनंतर आता मोठा पूरावा आला समोर

point

जॅस्मिनच्या त्या फोटोने झाली पोल खोल

Hardik Pandya Jasmin Walia Dating : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने नुकताच पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasha stankovic) सोबत घटस्फोट घेतला आहे.या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याचे नाव एका ब्रिटीश  सिंगर सोबत जोडलं जातंय. जास्मिन वालिया (Jasmin Walia) असे या सिंगरचे नाव आहे. दोघेही डेट करत असल्याची चर्चा आहे. असे असताना आता दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा मोठा पुरावा सापडला आहे. नेमका हा पुरावा काय आहे? हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे विभक्त झाले आहेत. नुकतीच या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. या घटस्फोटानंतर नताशा सर्बियातील तिच्या घरी निघून गेली होती. तिच्या सोबत तिचा मुलगा देखील होता. तर हार्दिक पंड्या सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो सध्या ग्रीसमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसला आहे.  

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये, फक्त...

दरम्यान हार्दिक पंड्या वेकेशन मोडवर असताना त्याने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोनंतर त्याचे नाव गायिका जास्मिन वालियासोबत जोडले जाऊ लागले. खरं तर जास्मिन वालियाने पांड्याच्या काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो शेअर केले होते, जे ग्रीसमधील मायकोनोस बेटावरील आहेत. त्याचा एक फोटो स्विमिंग पूलच्या बाजूचा आहे. या फोटोनंतर, दोघांनी एकत्र सुट्टी साजरी केल्याची अफवा उडू लागली आहे. तसेच दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली होती.

नात्यात असल्याचा पुरावा काय?  

जॅस्मिन वालियाने ग्रीस वेकेशनच्या दरम्यान एक फोटो शेअर केला होता. या फोटोत जॅस्मिनच्या बाजूला बसलेल्या एका व्यक्तीचा हात दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा हात हार्दिक पांड्याचा असल्याचा दावा केला जात होता. त्याचसोबत पूल शेजारी असलेले दोघांचे फोटो पाहून अनेकांनी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधला आहे. 

    follow whatsapp