Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची प्रेमात उडाली झोप? कुणावर जडलाय जीव

रोहिणी ठोंबरे

• 01:49 PM • 19 Jun 2024

Shradha kapoor boyfriend : श्रद्धा कपूरची इंस्टाग्राम स्टोरी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून लेखक राहुल मोदीसोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रद्धा कपूरच्या 'त्या' स्टोरीत नेमकं काय? 

point

श्रद्धाचे नाव याआधी कोणासोबत जोडले गेले?

point

राहुल मोदीला करायची आहे चित्रपट निर्मिती?

Shraddha kapoor Insta viral post on Rahul Modi : श्रद्धा कपूरची इंस्टाग्राम स्टोरी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून लेखक राहुल मोदीसोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. पण आता तिची इंस्टाग्राम स्टोरी पाहता तिने राहुल मोदीसोबतचे लव्ह रिलेशन कन्फर्म केल्याचा अंदाज आहे. श्रद्धाने राहुलसोबतचा एक सेल्फी स्टोरीवर शेअर केला आणि त्याला हार्ट इमोजीसह खास कॅप्शन दिले आहे. (shraddha kapoor instagram story viral she shares selfie with rahul mody and caption it dil rakh le nind to wapas de de yaar)

हे वाचलं का?

श्रद्धा कपूरच्या 'त्या' स्टोरीत नेमकं काय? 

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येही श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसले होते. तेव्हाही दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. आता श्रद्धाने राहुल मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे आणि त्याला कॅप्शन देत लिहिलं की, 'दिल रख ले, निंद तो वापिस दे दे यार'... त्यासोबत स्टोरीला  ‘नींद चुराई मेरी’ हे गाणंही तिने लावलं आहे. 

हेही वाचा : Marashtra Election : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

 

2023 मध्ये श्रद्धा आणि राहुल डिनरसाठी एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले. 

श्रद्धाचे नाव याआधी कोणासोबत जोडले गेले?

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मोदीने प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटी आणि श्रद्धा कपूर-रणबीर कपूर स्टारर तू झूठी मै मक्कार, या चित्रपटांचे लेखन केले आहे. दोघेही 'तू झूठी मै मक्कार', या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले आणि तिथून त्यांची बॉन्डिंग स्ट्रॉन्ग झाल्याचे बोलले जाते. यापूर्वी श्रद्धा कपूरचे नाव फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत जोडले गेले होते.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? राऊतांनी दिली मोठी बातमी

 

राहुल मोदीला करायची आहे चित्रपट निर्मिती?

राहुल मोदी लव रंजन यांच्या प्यार का पंचनामा या चित्रपटात इंटर्न होता. काही प्रोजेक्ट्समध्ये त्याने असोसिएट डायरेक्टर म्हणूनही काम केलं आहे. राहुलने बिल्लू बार्बरच्या मरजानी या गाण्याचे शूटिंग पाहिले आणि त्यानंतर त्याची फिल्म मेकिंगमध्ये आवड निर्माण झाली.

हेही वाचा : Ravindra Waikar : अमोल कीर्तिकर 1 मताने होते आघाडीवर, मग 48 मतांनी कसे झाले पराभूत?

 

तर, श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची रणबीर कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसली होती. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसंच, 'स्त्री 2', 'धडकन 2', 'चालबाज इन लंडन' आणि 'चंदा मामा दूर' हे श्रद्धाचे आगामी चित्रपट आहेत.

    follow whatsapp