Stree 2 : जाळ न् धूर संगटच, तमन्ना भाटियाचं आयटम साँग, Hot लूक पाहूनच...

मुंबई तक

• 05:42 PM • 26 Jul 2024

Stree 2 Song Out : 'स्त्री 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'आज की रात' हे पहिले गाणे रिलीज केले आहे. तमन्ना भाटिया या आयटम साँगमध्ये नाचताना दिसत आहे. तमन्नाने तिच्या हॉट लुक आणि मनमोहक चालीने स्टेजला आग लावली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

'आज की रात' गाण्यात तमन्नाचा जलवा

Stree 2 Song Out : 'स्त्री 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'आज की रात' हे पहिले गाणे रिलीज केले आहे. तमन्ना भाटिया या आयटम साँगमध्ये नाचताना दिसत आहे. तमन्नाने तिच्या हॉट लुक आणि मनमोहक चालीने स्टेजला आग लावली आहे. तमन्नाला पाहून चाहते तिच्या प्रेमातच पडले आहेत. इतकंच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिकही या गाण्यात कॅमिओ करताना दिसत आहे. (stree 2 tamannaah bhatia item song-aaj-ki-raat out now youtube shraddha kapoor rajkummar rao)

हे वाचलं का?

'आज की रात' गाण्यात तमन्नाचा जलवा

अमर पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुरानासोबत तमन्ना डान्स करताना दिसत आहे. 'आज की रात' हे गाणे मधुबनाती बागची, दिव्या कुमार आणि सचिन-जिगर यांनी गायले आहे. सचिन-जिगर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. लिरिक्स अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

हेही वाचा : Premanand Maharaj : 'फिगर मेन्टेन करणं सोडा, हिंदू महिलांनो तुम्ही 4 मुलं...', प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणे यूट्यूबवर रिलीज करताच, तमन्नाच्या धमाकेदार डान्स मूव्ह्स पाहून चाहते वेडे झाले. यामध्ये इनट्रेस्टिंग गोष्ट अशी आहे की, चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनीही या गाण्यात कॅमिओ केला आहे.

चाहत्यांना आशा आहे की 'स्त्री 2' यावेळी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल. चाहत्यांनी लावलेले हे अंदाज कितपत खरे ठरतायेत हे आता वेळ आल्यावरच समजेल. 'स्त्री' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. हा त्याचा अधिकृत सिक्वेल आहे. 

हेही वाचा : Champions Trophy 2025 : हरभजन सिंह पाकिस्तानवर भडकला, असं घडलं तरी काय?

 

'स्त्री' मध्ये श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी देखील होते. अमर कौशिकने त्याच कलाकारांसोबत एकत्र येऊन 'स्त्री 2' ची कथा पुन्हा पुढे नेली आहे. तुम्ही काहीही म्हणा पण, मजा मात्र खूप येणार आहे.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याची कहाणी चाहत्यांना खूप आवडली. 'स्त्री 2' 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होत आहे.

    follow whatsapp