Raveena Tandon ला फसवण्याचा प्रयत्न? घराबाहेरील CCTV मध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड

रोहिणी ठोंबरे

02 Jun 2024 (अपडेटेड: 02 Jun 2024, 03:48 PM)

Bollywood Actress Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवीनाने एका वृद्ध महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

रवीना टंडनसोबत नेमकं घडलं काय?

point

अभिनेत्रीला फसवण्याचा प्रयत्न?

Viral Video of Ranveena Tandon on Social Media : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवीनाने एका वृद्ध महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पण यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे रवीनाच्या घराबाहेरील CCTV फुटेज आहे. (trying to trap raveena tandon the entire incident was captured on cctv outside her house)  

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

सकाळपासून इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्री सर्वांना शांत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये रवीना धक्काबुक्की करू नका आणि मारहाण करू नका असे आवाहन करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या घराबाहेर ही घटना घडली. या घटनेतील पीडित कुटुंबाच्या वतीने रवीनावर दारूच्या नशेत महिलांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनेमागील सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित कुटुंबाकडून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Lok Sabha : उद्धव ठाकरे 'या' 14 जागा जिंकणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीना टंडनचा ड्रायव्हर घराबाहेर कार पार्क करण्यासाठी रिव्हर्स घेत होता. तर आरोप करणारे कुटुंब तेथून जात असताना त्यांनी ड्रायव्हरवर ओरडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप करणाऱ्या कुटुंबातील कोणालाही डोक्याला किंवा इतर कोणत्या ठिकाणी दुखापत झालेली नाही. त्यांनी स्वत: ड्रायव्हरला मारण्यासाठी घेराव घातला. भांडणाचा आवाज ऐकून रवीना घरातून बाहेर आली आणि भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला, जे व्हायरल व्हिडीओमध्येही दिसत आहे.

हेही वाचा : Maharashtra Exit Poll : सांगली, बारामती कुणाचा 'गेम'? पहा एक्झिट पोल

अभिनेत्रीला फसवण्याचा प्रयत्न?

रवीनाच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, अभिनेत्री तिच्या दोन मुलांसह घरी होती. घटनेची माहिती मिळताच ती घराबाहेर आली आणि तिने तिच्या ड्रायव्हरला गर्दीतून वाचवायला सुरुवात केली. यादरम्यान आरोप करणाऱ्या कुटुंबाने ड्रायव्हर आणि रवीनाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा : West Bengal exit poll : ममता बॅनर्जीना बसणार जबर धक्का! बंगालमध्ये 'खेला होबे'

रवीना नशेत होती हे तथ्यही खोटे असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण घटना अभिनेत्रीच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाली आहे. हे प्रकरण खार पोलीस ठाण्यात पोहोचले पण दोन्ही पक्षांनी एफआयआर नोंदवला नाही.

    follow whatsapp